JOIN US
मराठी बातम्या / मनी / Post Office Schemes: पैसे बुडण्याची भीती नाही आणि बँकेपेक्षा जास्त व्याज; गुंतवणूकदारांना फायदा

Post Office Schemes: पैसे बुडण्याची भीती नाही आणि बँकेपेक्षा जास्त व्याज; गुंतवणूकदारांना फायदा

किसान विकास पत्र अंतर्गत, 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती आपले खाते उघडू शकते. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने प्रौढ खाते उघडले जाऊ शकते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जून : अनेकांना कमी वेळेत पैसा कमवायचा असतो त्यामुळे ते शेअर बाजारात यासाठी प्रयत्न करतात. मात्र शेअर बाजारातील जोखीम मोठ्या प्रमाणात आहे. जर तुम्ही जोखीम न घेता गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) नावाची योजना तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते. पोस्ट ऑफिसची ही योजना (Post Office Schemes) सर्वात लोकप्रिय आहे, कारण यामध्ये उत्तम रिटर्न मिळण्यासोबतच तुमचे पैसेही सुरक्षित आहेत. तुम्ही या योजनेत अगदी कमी रकमेतूनही गुंतवणूक सुरू करू शकता. पैसे दुप्पट करण्यासाठी लोक या योजनेचा खूप वापर करतात. तसेच या पोस्ट ऑफिस योजनेत जोखीमही नाही. LIC ची आधार स्तंभ पॉलिसी, 30 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल लाखोंचा परतावा पैसा दुप्पट होण्याचा कालावधी किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांना 6.9 टक्के दराने व्याज मिळते. तुम्ही या योजनेत 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरु केल्यानंतर एक वर्षाच्या आत योजना बंद केल्यास तुम्हाला कोणतेही व्याज लाभ मिळणार नाही. किसान विकास पत्रातील तुमची गुंतवणूक 124 महिन्यांत म्हणजे 10 वर्षे 4 महिन्यांत दुप्पट होते. आज देशातील लाखो लोक किसान विकास पत्रात गुंतवणूक करून मोठा नफा कमावत आहेत. मृत्युपत्रातल्या या 6 चुकांमुळे तुमची ‘इच्छा’ होऊ शकते अवैध! जाणून घ्या सविस्तर कोण गुंतवणूक करू शकतात? किसान विकास पत्र अंतर्गत, 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती आपले खाते उघडू शकते. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने प्रौढ खाते उघडले जाऊ शकते. अल्पवयीन व्यक्तीचे वय 10 वर्षे पूर्ण झाल्यावर खाते त्याच्या नावावर होते. याशिवाय तीन व्यक्ती एकाच वेळी संयुक्त खातेही उघडू शकतात. या योजनेचा लाभ देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून मिळू शकतो. एवढेच नाही तर या योजनेत सामील झाल्यानंतर तुम्हाला आयकरात सूटही मिळते. तसेच तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या