JOIN US
मराठी बातम्या / मनी / Patanjali Credit Card मधून ग्राहकांना मिळणार या सुविधा, PNB-Rupay च्या सहयोगाने नवीन कार्ड लाँच

Patanjali Credit Card मधून ग्राहकांना मिळणार या सुविधा, PNB-Rupay च्या सहयोगाने नवीन कार्ड लाँच

पतंजली आयुर्वेद कंपनीने पंजाब नॅशनल बॅंकेच्या (PNB and Patanjali) सहकार्यानं आणि ‘रूपे’च्या (Rupay) माध्यमातून एक अनोखं क्रेडिट कार्ड (Patanjali Credit Card) लॉंच केलं आहे. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना विविध सुविधा मिळणार असल्याची माहिती बाबा रामदेव यांनी कार्ड लॉंचिंगवेळी दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 मार्च: योगगुरू बाबा रामदेव (Yogguru Baba Ramdev) यांच्या पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurved) कंपनीची उत्पादनं विशेष लोकप्रिय आहेत. सौंदर्यप्रसाधनं, आयुर्वेदिक औषधं, तसंच अन्नधान्य, विविध पदार्थ आदींचा समावेश या उत्पादनांमध्ये आहे. वैविध्यपूर्ण उत्पादनांसोबतच आता पतंजली आयुर्वेद कंपनीने पंजाब नॅशनल बॅंकेच्या (PNB and Patanjali) सहकार्यानं आणि ‘रूपे’च्या (Rupay) माध्यमातून एक अनोखं क्रेडिट कार्ड (Patanjali Credit Card) लॉंच केलं आहे. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना विविध सुविधा मिळणार असल्याची माहिती बाबा रामदेव यांनी कार्ड लॉंचिंगवेळी दिली. या वर्षी जानेवारी महिन्यात बाबा रामदेव यांनी पीएनबीचं क्रेडिट कार्ड लॉंच करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातल्या पंजाब नॅशनल बॅंकेने रूपेच्या सहकार्यातून तयार केलेल्या पतंजली क्रेडिट कार्डचं बाबा रामदेव यांनी उद्घाटन केलं आहे. पतंजली क्रेडिट कार्डच्या लॉंचिंगवेळी बोलताना बाबा रामदेव म्हणाले, ‘पतंजली आयुर्वेदची उत्पादनं या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी सूट मिळेल. ग्राहकांना क्रेडिट कार्डचं बिल देण्यासाठी 50 दिवसांचा अवधी मिळेल. बिल भरण्यास सक्षम नसलेले ग्राहक 18 महिन्यांत 12 टक्के व्याजासह बिल अदा करू शकतील. ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत एक नवा इतिहास रचला जात आहे. पीएनबी आणि रूपेच्या सहकार्याने लवकरात लवकर 1 कोटी क्रेडिट कार्डधारक पूर्ण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.’ हे वाचा- घर घेताय? जाणून घ्या कोणत्या बँका देताहेत सर्वात कमी व्याजदरात Home Loan ‘पीएनबी रूपे पतंजली क्रेडिट कार्डच्या ग्राहकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. यात दोन अ‍ॅडऑन कार्ड्सही मिळतील. या कार्ड्सचा वापर तुमच्यासह तुमचे कुटुंबीयदेखील करू शकतील. ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहेत,’ असं पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. पीएनबी रूपे पतंजली क्रेडिट कार्डचे दोन प्रकार टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, पीएनबी रूपे पतंजली क्रेडिट कार्डचे दोन प्रकार असून, यात पीएनबी रूपे प्लॅटिनम (PNB Rupay Platinum) आणि पीएनबी रूपे सिलेक्ट (PNB Rupay Select) या कार्ड्सचा समावेश आहे. ही दोन्ही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्स कॉन्टॅक्टलेस आहेत. या कार्डच्या माध्यमातून पतंजली स्टोअरमध्ये शॉपिंग केल्यास ग्राहकांना कॅशबॅक (Cashback) मिळेल. प्रत्येक वेळी 2500 रुपयांपेक्षा अधिक खरेदी केल्यास ग्राहकांना दोन टक्के कॅशबॅक मिळेल; पण हा कॅशबॅक एका ट्रान्झॅक्शनवर 50 रुपयांपेक्षा अधिक नसेल. याशिवाय कार्ड अ‍ॅक्टिव्हेट होताच 300 रिवॉर्ड पॉइंट्स ग्राहकांना मिळतील. प्लॅटिनम कार्डसाठी कोणतीही जॉयनिंग फी (Joining Fee) नाही. परंतु, यासाठी 500 रुपये वार्षिक शुल्क आहे. सिलेक्ट क्रेडिट कार्डसाठी जॉयनिंग फी 500 रुपये, तर वार्षिक शुल्क 750 रुपये आहे. हे वाचा- इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं निर्मितीसाठी Reliance-Sanmina मधील करार ठरेल महत्त्वाचा आचार्य बालकृष्ण म्हणाले की ‘पतंजलीचं क्रेडिट कार्ड पतंजलीचं मेगा स्टोअर, पतंजलीची रुग्णालयं आणि पीएनबीच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. 60 टक्के क्रेडिट कार्ड्सची निर्मिती पतंजली आयुर्वेद, तर 40 टक्के क्रेडिट कार्ड्सची निर्मिती पंजाब नॅशनल बॅंक करील.’ या क्रेडिट कार्डमध्ये कॅशबॅक, लॉयल्टी पॉइंट, इन्शुरन्स कव्हर (Insurance Cover) यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. या कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना पीएनबीकडून 5 लाख रुपयांचं इन्शुरन्स कव्हर मिळेल. स्वदेशी समृद्धी कार्डवर ग्राहकांना 5 लाखांचे इन्शुरन्स कव्हर मिळतं. पतंजली उत्पादने खरेदी केल्यावर ग्राहकांना 5 ते 7 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. विशेष म्हणजे ग्राहक या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही कंपनीचं उत्पादन खरेदी करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या