JOIN US
मराठी बातम्या / मनी / खुशखबर! दिवाळीआधी शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

खुशखबर! दिवाळीआधी शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी पिकांच्या एमएसपी -किमान आधारभूत किंमती वाढविण्यास मान्यता देण्यात आली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लक्ष्मण रॉय, प्रतिनिधी, नवी दिल्ली : दिवाळीआधी पुन्हा एकदा मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळाली आहे. पीएम किसान योजनेंतर्गत २००० रुपयांचा हप्ता नुकताच खात्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी पिकांच्या एमएसपी -किमान आधारभूत किंमती वाढविण्यास मान्यता देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार डाळींच्या एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढसाठी मंजुरी मिळाली आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ करण्यात आली. त्याचबरोबर मोहरीच्या एमएसपीमध्ये क्विंटलमागे 400 रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

RBI ची पुन्हा एकदा 2 सहकारी बँकांवर कारवाई, तुमची बँक तर नाही?
पिकक्विंटलमागे दरवाढ
मसूर500 रुपये प्रति क्विंटल
मोहरी400 रुपये प्रति क्विंटल
गहू110 रुपये प्रति क्विंटल
ज्वारी100 रुपये प्रति क्विंटल
चणा105 रुपये प्रति क्विंटल
सूर्यफुल209 रुपये प्रति क्विंटल
5Gमुळं सामान्य व्यावसायिकांना होणार मोठा फायदा; वाचा हा स्पेशल रिपोर्ट

संबंधित बातम्या

सरकार किमान आधारभूत किंमत ठरवते आणि तेवढ्या किंमतीमध्ये शेतकऱ्यांकडून पिक घेते. त्याच्या खाली शेतकऱ्यांकडून पिक घेता येत नाही. आधीच अस्मानी संकटामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढती महागाई आणि सध्याची स्थिती पाहता शेतकऱ्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.

CACP ने 3 ते 9 टक्क्यांपर्यंत MSP वाढवण्याची शिफारस केली होती. या शिफारसीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता याबाबत महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असून याबाबत घोषणा करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या