पीएम किसान योजना
PM Kisan Yojana Latest Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 13वा हप्ता जारी करण्यात आला आहे. तर 14वा हप्ता 28 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी करण्यात येणार आहे. डीबीटीद्वारे 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर 2-2 हजार रुपये पाठवले जातील. ज्यांनी ई-केवायसी केले आहे त्यांनाच हा हप्ता दिला जाईल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तुम्ही PM किसान योजनेअंतर्गत KYC केले नसेल, तर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 14 वा हप्ता मिळणार नाही. EKY AAP PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन केले जाऊ शकते. Business Ideas: गावात स्वस्तात सुरु होतील हे बिझनेस, रिकाम्या जागेचा वापर करुन करा भरघोस कमाई या लोकांना मिळणार नाही हप्ता तुमचं नाव यादीत असेल तर तुम्हाला हप्त्याची रक्कम मिळेल. मात्र, तुमच्याकडून काही चूक झाली असेल, तर ही हप्त्याची रक्कम थांबू शकते. तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन लाभार्थ्यांची यादी चेक करु शकता. तुमचे नाव या लिस्टमध्ये आहे, परंतु फॉर्म भरताना तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करा, अन्यथा 14 वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. जर एखाद्या शेतकऱ्याने टॅक्स भरला तर त्याला पीएम किसान योजनेंतर्गत हप्ता मिळणार नाही. यासोबतच संपूर्ण कागदपत्रे न देणाऱ्या शेतकऱ्यांनाही हप्ता दिला जाणार नाही. याशिवाय चांगले उत्पन्न असलेले मोठे शेतकरीही या हप्त्याच्या रकमेपासून वंचित राहणार आहेत. PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी अकाउंटमध्ये येणार पीएम किसानचा 14 वा हप्ता शेतकरी येथे करू शकतात संपर्क PM किसान योजनेअंतर्गत तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या किंवा कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.