JOIN US
मराठी बातम्या / मनी / PM Kisan Yojana : तुमच्या खात्यावर आले नाहीत पैसे? मग असू शकतात ही 5 कारणं

PM Kisan Yojana : तुमच्या खात्यावर आले नाहीत पैसे? मग असू शकतात ही 5 कारणं

यामागे नेमकी काय 5 कारणं आहेत ज्यामुळे तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही ते समजून घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : पीएम किसान सम्मान योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही 2000 रुपयांची रक्कम जमा झाली नाही. यामागे नेमकी काय 5 कारणं आहेत ज्यामुळे तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही ते समजून घेऊया. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. कर्नाटकातील बेळगाव इथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 16,800 कोटी रुपये ट्रान्सफर केले. 13 वा हप्त्याचा लाभ 8 कोटी 2 लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे. योजनेशी संबंधित काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३व्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत. हप्ता तुमच्या खात्यावर जमा न होण्याची अनेक कारण असू शकतात.

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 13 व्या हप्त्याचा लाभ, पण नेमकं कारण काय?

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना, कोणतीही माहिती भरण्यात चूक करणे, पत्ता देणे किंवा चुकीचे बँक खाते देणे आणि एनपीसीआयमध्ये आधार सीडिंग न करणे, पीएफएमएस किंवा ई KYC न केल्याने तुमच्या खात्यावर तेरावा हप्ता आलेला नाही.

तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या. फार्मर कॉर्नर असं लिहिलेलं असेल त्यावर क्लिक करा. यानंतर लाभार्थी स्टेटसवर क्लिक करा. हे केल्यानंतर, तुम्हाला आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल. यापैकी कोणताही एक अपलोड करून क्लिक करा. तुम्हाला मिळालेल्या पीएम किसानच्या हप्त्यांचा तपशील इथे दिसतील.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! आज खात्यावर जमा होणार पैसे, तुम्हाला मिळणार का लाभ?

संबंधित बातम्या

तुम्हाला तिथे सगळी माहिती मिळेल. तुम्ही या वेबसाईटवर दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून तुम्ही तुमच्या अडचणी सांगू शकता. तिथून तुम्हाला गाइडन्स देखील मिळेल. याशिवाय न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटवर देखील पीएम किसान योजनेचे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या