JOIN US
मराठी बातम्या / मनी / आता PhonePe वरुन विदेशातही करता येईल पेमेंट, ही सेवा देणारे देशातील पहिले अ‍ॅप!

आता PhonePe वरुन विदेशातही करता येईल पेमेंट, ही सेवा देणारे देशातील पहिले अ‍ॅप!

फोनपेवरुन आता विदेशातही पेमेंट करता येणार आहे. लवकरच ही सुविधा सुरु केली जाणार आहे.

जाहिरात

विदेशातही करता येईल फोनपेचा वापर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सध्याच्या काळात ऑनलाइन पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध अ‍ॅपच्या माध्यमातून आपण क्षणार्धात पैसे ट्रान्सफर करु शकतो. आता PhonePe UPI द्वारे आंतरराष्ट्रीय पेमेंट सुविधा सुरू करणार आहे. याद्वारे, भारतातील PhonePe यूझर्स परदेशात प्रवास करताना UPI वापरून आंतरराष्ट्रीय व्यापार्‍यांना पेमेंट करू शकतील. सध्या या फीचरमध्ये यूएई, सिंगापूर, नेपाळ आणि भूतान यांचा समावेश करण्यात येईल. ही सुविधा मिळवम्यासाठी, PhonePe अ‍ॅपमध्ये UPI इंटरनॅशनल अ‍ॅक्टिव्हेट करणे आवश्यक आहे. या सुविधेविषयी फोन पेने म्हटले की, ‘यूझर्स थेट त्यांच्या भारतीय बँकेतून विदेशी चलनात पेमेंट करू शकतील - जसे ते आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डसह करतात.’ PhonePe ने एका निवेदनात म्हटले आहे. फिनटेक इंडस्ट्री एक्झिक्युटिव्हच्या मते, हे पाऊल मोठ्या फॉरेक्स मार्केटचा एक भाग काबीज करण्याचा PhonePe द्वारे केलेला प्रयत्न असल्याचे दिसते. ही अशी कॅटेगिरी आहे जिथे पेमेंट अ‍ॅप्सना अतिरिक्त पैसे कमावण्याची थेट संधी आहे. ‘या’ 13 कोटी लोकांचं पॅनकार्ड होऊ शकतं बंद, यात तुम्ही तर नाही ना?  

नवीन फीचर गेमचेंजर ठरेल

कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य टेक्नोलॉजी ऑफिसर राहुल चारी म्हणाले, ‘गेल्या 6 वर्षांमध्ये, आम्ही संपूर्ण भारतभर UPI पेमेंट रिवॉल्यूशन अनुभव घेतला आहे. UPI इंटरनॅशनल हे UPI अनुभव उर्वरित जगापर्यंत नेण्याच्या दिशेने पहिले मोठे पाऊल आहे.’ चारी म्हणाले की, ‘हे फीचर लॉन्च करणे ‘गेमचेंजर’ ठरु शकते. तसेच परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांची पेमेंट करण्याची पद्धत पूर्णपणे बदलेल.’ आता जनरल रेल्वे तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही, ‘या’ अ‍ॅपवरुन करा बुकिंग

इतर फिनटेक अ‍ॅप्स देखील क्रॉस बॉर्डर पेमेंट सुरू करतील

काही इतर फिनटेक अ‍ॅप्स देखील येत्या काही महिन्यांत क्रॉस बॉर्डर UPI सपोर्ट सुरू करू शकतात. UPI ने गेल्या महिन्यात 8 बिलियन पेक्षा जास्त ट्रान्झेक्शन प्रोसेस केले. UPI इंटरनॅशनल सध्याच्या NPCI च्या रोडमॅपवर आहे. परदेशी बाजारपेठेत UPI पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यापाऱ्यांना ऑनबोर्डिंग करणे ही भारताच्या NPCI साठी एका टेस्ट प्रमाणे असेल. कारण व्यापाऱ्यांशिवाय UPI यूझर्स पेमेंट करू शकणार नाहीत.

UPI मार्केटमध्ये PhonePe चा 49% हिस्सा आहे

डोमेस्टिक UPI मार्केटमध्ये, PhonePe, Google Pay, Paytm आणि CRD Pay या चार अ‍ॅप्सचा एकूण UPI मार्केट शेअर 96.4% आहे. भारतातील एकूण UPI व्यवहारांपैकी सुमारे 49% वाटा PhonePe ने घेतला आहे. PhonePe नंतर 34% शेअरसह Google Pay, 11% शेअरसह Paytm, 1.8% शेअरसह CRED Pay आणि 3.5% शेअरसह इतर WhatsApp, Amazon Pay आणि बँकिंग अ‍ॅप्सचे आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या