नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : तुमचेही EPFO मध्ये खाते असेल तर आता तुम्हाला पीएफशी संबंधित कोणत्याही समस्येची तक्रार करणे सोपे झाले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या ग्राहकांना तक्रारी करण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. जर एखाद्या EPF खातेधारकाला EPF काढणे, EPF खाते हस्तांतरित करणे, KYC इत्यादींशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर तो या तक्रार व्यवस्थापन प्रणालीद्वारे तक्रार नोंदवू शकतो. याशिवाय, तुम्ही EPFO च्या ट्विटर हँडल @socialepfo वर तक्रार किंवा प्रश्न देखील टाकू शकता किंवा तुम्ही टोल फ्री नंबर 1800-118-005 वर देखील तुमची तक्रार नोंदवू शकता. कशी करावी तक्रार? https://epfigms.gov.in/ वर जा तक्रार नोंदवण्यासाठी ‘रजिस्टर ग्रीव्हन्स’ वर क्लिक करा. आता एक नवीन वेबपेज उघडेल. यामध्ये, ज्या स्टेटसमध्ये तक्रार नोंदवली जात आहे ते निवडा. स्टेटस म्हणजे पीएफ सदस्य, ईपीएस पेन्शनर, नियोक्ता किंवा इतर. तुमच्याकडे UAN/पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नसल्यासच ‘इतर’ पर्याय निवडा. पीएफ खात्याशी संबंधित तक्रारीसाठी ‘पीएफ सदस्य’ स्टेटस निवडावा लागतो. त्यानंतर UAN आणि सुरक्षा कोड टाका आणि ‘Get Details’ वर क्लिक करा. UNN शी लिंक केलेले मास्क्ड घातलेले (लपलेले) वैयक्तिक तपशील संगणकाच्या स्क्रीनवर दिसतील. आता ‘Get OTP’ वर क्लिक करा. यानंतर EPFO डेटाबेसमध्ये तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल. OTP टाकल्यानंतर तो व्हेरीफाय केला जाईल. त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारली जाईल. वैयक्तिक तपशील प्रविष्ट केल्यानंतर, ज्या पीएफ क्रमांकावर तक्रार नोंदवायची आहे त्यावर क्लिक करा. आता स्क्रीनवर एक पॉप अप दिसेल. यामध्ये तुमची तक्रार ज्या रेडिओ बटणाशी संबंधित आहे ते निवडा. तक्रार श्रेणी निवडा आणि तुमच्या तक्रारीचा तपशील द्या. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते अपलोड करता येतील. तक्रार नोंदवल्यानंतर ‘Add’ वर क्लिक करून सबमिट वर क्लिक करा. यानंतर तक्रार नोंदवली जाईल. तुमच्या नोंदणीकृत ईमेल आणि मोबाईल क्रमांकावर तक्रार नोंदणी क्रमांक येईल. तो लिहून ठेवा. वाचा - आमच्याकडे पैसे ठेवा, मिळणार सर्वाधिक व्याज; नामांकीत बँकेचा ग्राहकांना SMS तक्रारीची स्थिती कशी तपासायची ईपीएफओकडे तक्रार नोंदवल्यानंतर तुम्ही त्याची स्थिती देखील जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतील. https://epfigms.gov.in/ वर जा. ‘व्ह्यू स्टेटस’ हा पर्याय निवडा. तक्रार नोंदणी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी आणि सुरक्षा कोड टाकून सबमिट करा. आता कॉम्प्युटर स्क्रीनवर तक्रारीचं स्टेटस दिसेल. तुमच्या तक्रारीवर ईपीएफओचे कोणते प्रादेशिक कार्यालय काम करत आहे हे देखील दर्शवेल आणि अधिकाऱ्याचे नाव देखील येईल. प्रादेशिक EPFO कार्यालयाशी संपर्क साधायचा असल्यास, ईमेल पत्ता आणि फोन नंबर स्क्रीनवर प्रदर्शित होईल.