JOIN US
मराठी बातम्या / मनी / Petrol Diesel Prices : महाशिवरात्रीला राज्यात स्वस्त झालं पेट्रोल, पाहा आजचे नवे दर

Petrol Diesel Prices : महाशिवरात्रीला राज्यात स्वस्त झालं पेट्रोल, पाहा आजचे नवे दर

Petrol Diesel Prices Today: महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये बदलल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती, पाहा तुमच्या शहरातील दर

जाहिरात

पेट्रोल डिझेल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पेट्रोल च्या किंमती बदलल्या आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. आज WTI क्रूड 2.74 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 76.34 डॉलरवर व्यापार करत आहे. ब्रेंट क्रूड देखील 2.14 (2.51%) ने घसरून 83 डॉलरवर पोहोचलं आहे. देशातील तेल कंपन्यांनी दररोज सकाळप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा दर 1.02 रुपयांनी कमी होऊन 106.15 रुपये प्रतिलिटर झाला आहे. डिझेल 99 पैशांनी घसरून 92.67 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. पंजाबमध्ये पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी महागलं आहे. उत्तर प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली आहे. तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकातही पेट्रोल डिझेल महाग झालं आहे.

पेट्रोल-डिझेल की सीएनजी? तुमचाही होतोय गोंधळ? कोणताही निर्णय घेण्याआधी ह्या फॅक्ट्स वाचा

प्रमुख महानगरांमधील दर दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर नोएडामध्ये पेट्रोल 96.79 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रतिलिटर झाले आहे. गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर. लखनौमध्ये पेट्रोल 96.47 रुपये आणि डिझेल 89.66 रुपये प्रतिलिटर झाले आहे. पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर मिळणार नाही पेट्रोल-डिझेल

संबंधित बातम्या

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

तुम्ही घसबसल्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त एक SMS करायचा आहे. 9224992249 /9223112222/ 9222201122 या नंबरवर तुम्हाला तुमच्या शहरातील कोड लिहून पाठवयाचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथले दर मिळू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या