Petrol, Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पेट्रोल अन् डिझेलचे आजचे दर जाहीर, वाचा सविस्तर
नवी दिल्ली, 6 मार्च : रशिया - युक्रेन युद्धाचा परिणाम पेट्रोल-डिझेल दरावर होण्याची मोठी शक्यता आहे. पुढील आठवड्यात उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात दररोज वाढ होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. तेल कंपन्यांनी नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे कंपन्यांनी दरात वाढ केली नसल्याचं मानलं जात आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान कच्च्या तेलाचे दर रेकॉर्ड स्तरावर आहेत. क्रूड ऑइल 118 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. हा मागील सात वर्षातील सर्वोच्च स्तर आहे. महागड्या क्रूड ऑइलदरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) जारी केले आहे. तेल कंपन्यांनी आज लखनऊ, गुरुग्राम, जयपूर, पटनासारख्या शहरांत इंधन दरात बदल केले आहेत. परंतु मागील चार महिन्यांपासून मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्लीसारख्या महानगरांत पेट्रोल-डिझेल दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल किंमत सर्वाधिक 110 रुपये प्रति लीटर जवळपास आहे.
असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
पुणे | 109.45 रुपये | 92.25 रुपये |
---|---|---|
मुंबई | 109.98 रुपये | 94.14 रुपये |
नाशिक | 109.49 रुपये | 92.29 रुपये |
नागपूर | 109.71 रुपये | 92.53 रुपये |
अहमदनगर | 110.15 रुपये | 92.92 रुपये |
औरंगाबाद | 110.38 रुपये | 93.14 रुपये |
रत्नागिरी | 110.97 रुपये | 93.68 रुपये |
रायगड | 109.48 रुपये | 92.25 रुपये |
परभणी | 112.49 रुपये | 95.17 रुपये |
पालघर | 109.75 रुपये | 92.51 रुपये |
सांगली | 110.03 रुपये | 92.83 रुपये |
कोल्हापूर | 110.09 रुपये | 92.89 रुपये |
गेल्या नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Hike) वाढ केलेली नाही. त्यामुळे तेल कंपन्यांना इंधनाच्या विक्रीतून तोटा सहन करावा लागत आहे. इंधनावरील कंपन्यांचे मार्जिन उणेवर गेले आहे. त्याला प्रतिलिटर विक्रीतून 1.54 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. त्यामुळे निवडणुकांनंतरइंधन दर वाढण्याची शक्यता वाढवण्यात आली आहे.