JOIN US
मराठी बातम्या / मनी / Petrol Price Today: आज पेट्रोलचे दर सामान्यांना परवडणारे आहेत का? जाणून घ्या इंधनाचा लेटेस्ट भाव

Petrol Price Today: आज पेट्रोलचे दर सामान्यांना परवडणारे आहेत का? जाणून घ्या इंधनाचा लेटेस्ट भाव

सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel New Price today) नवे दर जारी केले आहेत. आज 5 नोव्हेंबर रोजी इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर: सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel New Price today) नवे दर जारी केले आहेत. आज 5 नोव्हेंबर रोजी इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत आज पेट्रोलचे दर 109.98 रुपये आणि डिझेलचे दर 94.14 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. मुंबईत बुधवारी पेट्रोलचे दर 115.85 रुपये प्रति लीटर होते, दिवाळीदिवशी 4 नोव्हेंबर रोजी पेट्रोलचे दर 5.87 रुपयांनी कमी झाले आहे. दरम्यान डिझेलचे दर बुधवारी 106.62 रुपये प्रति लीटर होते, तर काल मुंबईत डिझेल 12.48 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. ऐन दिवाळीच्या (diwali 2021 petrol Price) मुहुर्तावर अखेर मोदी सरकारने (modi government decision on petrol diesel excise duty) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर (Petrol-Diesel Excise Duty Cut) कमी केला आहे. याचा परिणाम इंधनाच्या किंमतीवर होऊन दर उतरले आहेत. हे वाचा- प्लॅस्टिकपासून बनवलेल्या पेट्रोल डिझेलची या राज्यात विक्री चालू; 70रुपये लिटर दर चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 4 November 2021) >> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर » मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर » चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर » कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर हे वाचा- लवकरच तुमची कार धावेल 60 रुपये प्रतिलिटर दरात, मोदी सरकारचा नवा प्लॅन दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या