JOIN US
मराठी बातम्या / मनी / सामान्यांच्या खिशावरील भार वाढला, सलग 21व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले

सामान्यांच्या खिशावरील भार वाढला, सलग 21व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावरील भार देखील वाढू लागला आहे.

जाहिरात

असा निर्णय झाला तर तो सर्व सामान्यांसाठी मोठा दिलासा असणार आहे. कोरोनामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. वाहतुकदारांना फटका बसला असून त्यांनाही याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 जून : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावरील भार देखील वाढू लागला आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी IOC ने सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये  (Petrol and Disel Price Today) वाढ केली आहे. शनिवारी मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव 87.14 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे भाव 78.71 रुपये प्रति लीटर इतके आहेत. दिल्लीमध्ये तर पेट्रोलपेक्षा महाग डिझेल झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये रोज अपडेट होत असतात, दररोज सकाळी 6 वाजता या  इंधनांचे नवे दर येतात. पेट्रोलचे भाव प्रति लीटर 25 पैशांनी तर डिझेलचे भाव  प्रति लीटर 21 पैशांनी वाढले आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये असणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती -मुंबई : पेट्रोल 87.14 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 78.71 रुपये प्रति लीटर -दिल्ली :  पेट्रोल 80.38 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 80.40 रुपये प्रति लीटर -नोएडा :  पेट्रोल 81.04 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 72.48 रुपये प्रति लीटर (हे वाचा- काय आहे सुशांत आणि सिया कक्कर आत्महत्येचं कनेक्शन? कुटुंबीयांची धक्कादायक माहिती -लखनऊ :  पेट्रोल 80.94 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 72.37 रुपये प्रति लीटर -चेन्नई :  पेट्रोल 83.59 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 77.61 रुपये प्रति लीटर -कोलकाता :  पेट्रोल 82.05 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 75.52 रुपये प्रति लीटर (हे वाचा- नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! PF चे व्याजदर पुन्हा एकदा घटण्याची शक्यता ) -भोपाळ :  पेट्रोल 88.03 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 79.82 रुपये प्रति लीटर अशाप्रकारे तपासाल पेट्रोल-डिझेलचे नवे भाव पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या