JOIN US
मराठी बातम्या / मनी / Paytm Q3 Result: पेटीएमचा तोटा वाढला; मात्र महसुलात 89 टक्क्यांची वाढ

Paytm Q3 Result: पेटीएमचा तोटा वाढला; मात्र महसुलात 89 टक्क्यांची वाढ

पेटीएमची इश्यू किंमत 2150 रुपये होती. कंपनीचा शेअर 22 नोव्हेंबरला लिस्ट झाला होता आणि पहिल्याच दिवशी तो 27 टक्क्यांनी घसरला होता. पेटीएम स्टॉकने कधीही त्याची किंमत 2080-2150 रुपयांपर्यंत पोहोचलेली नाही.

जाहिरात

Paytm

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 फेब्रुवारी : Fintech प्रमुख Paytm Limited ने तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ तोटा (consolidated net loss) वाढून 778 कोटी रुपये झाला. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला 482 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता आणि वर्षभरापूर्वीच्या कालावधीत 532 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. दरम्यान, कंपनीचा महसूल समीक्षाधीन तिमाहीत 89 टक्क्यांनी वाढून 1456 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा महसूल 772 कोटी रुपये होता. शुक्रवारी संपलेल्या ट्रेडिंग आठवड्यात पेटीएमचे शेअर्स 0.89 टक्क्यांनी वाढून 952.90 रुपयांवर बंद झाले. पेटीएमच्या (Paytm) मते, ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापारी बेसमधील वाढ, यूजर्समधील वाढ आणि सणासुदीच्या हंगामात तिसर्‍या तिमाहीत सकल व्यापारी मूल्य (gross merchandise value) वार्षिक 123 टक्क्यांनी वाढून 2.5 लाख कोटी रुपये झाले. पेटीएम कंपनीचे निकाल शुक्रवारी रात्री उशिरा आले. पेटीएमने सांगितले की त्यांच्याकडे निव्वळ रोकड (Net Cash), रोख समतुल्य (cash equivalent) आणि 10,215 कोटी रुपयांची गुंतवणूक शिल्लक आहे. आता जमिनींसाठीही असणार ‘Aadhar’ सारखा number, PM KISAN योजनेसाठी ठरेल फायदेशीर पेटीएम शेअरमध्ये थोडी सुधारणा लिस्टिंग दिवसापासून पेटीएमच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. जानेवारीच्या शेवटच्या दिवसांत 915 रुपयांच्या नीचांकी स्तरावर आल्यानंतर, स्टॉकमध्ये किंचित सुधारणा होत आहे. सध्या हा शेअर 952.90 रुपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्याकडे असणारी 500 ची नोट नकली तर नाही ना? अशाप्रकारे झटक्यात ओळखा पेटीएमची इश्यू किंमत 2150 रुपये होती. कंपनीचा शेअर 22 नोव्हेंबरला लिस्ट झाला होता आणि पहिल्याच दिवशी तो 27 टक्क्यांनी घसरला होता. पेटीएम स्टॉकने कधीही त्याची किंमत 2080-2150 रुपयांपर्यंत पोहोचलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या