JOIN US
मराठी बातम्या / मनी / Paytm अलर्ट! ग्राहकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकते फसवणूक

Paytm अलर्ट! ग्राहकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकते फसवणूक

कोरोनाच्या संकटकाळात जर तुम्ही पेमेंटसाठी कॅशलेस पद्धती वापरत असाल आणि डिजिटल पेमेंटच्या पर्यायांपैकी तुम्ही जर Paytm चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 05 मे : कोरोनाच्या संकटकाळात जर तुम्ही पेमेंटसाठी कॅशलेस पद्धती वापरत असाल आणि डिजिटल पेमेंटच्या पर्यायांपैकी तुम्ही जर Paytm चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पेटीएम युजर्सना पेटीएमच्या संस्थापकांनी असा इशारा दिला आहे की, ग्राहकांनी ‘पैसे दुप्पट करून देतो’ अशा बनावट मेसेज किंवा मेल्सपासून सावधानता बाळगली पाहिजे. विजय शेखर शर्मा यांनी ट्विटरवरून ग्राहकांना या स्कॅमपासून सांभाळून राहण्याचा इशारा दिला आहे. ऑनलाइन फ्रॉडचा शिकार झालेल्या एका पेटीएम युजरला उत्तर देताना विजय शेखर यांनी हा इशारा दिला आहे. (हे वाचा- PhonePe वापरून घरबसल्या करू शकता चांगली कमाई, सोन्यामध्ये देखील गुंतवणूक शक्य ) या पोस्टमध्ये शर्मा यांना एका युजरने सांगितले की पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषाला तो बळी पडल्यामुळे त्याचे 2000 रुपये बुडाले आहेत. शर्मा यांनी त्याच्या तक्रारीचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

टेलिग्रामवरून होत आहे फसवणूक शर्मा यांनी ट्विटरवर ज्या युजरच्या तक्रारीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, त्यावरून असे लक्षात येते की ही फसवणूक एका टेलिग्राम ग्रृपच्या माध्यमातून होत आहे. ज्यामध्ये फसवणूक करणारे भामटे ग्राहकांना पेटीएमच्या माध्यमातून पैसे पाठवण्यास सांगत आहेत आणि तेच पैसे त्यांना दुप्पट करून मिळतील असं आमिष दाखवण्यात येत आहे. ज्या युजरने तक्रार केली आहे, त्याचे देखील 2000 रुपये बुडाले आहेत. (हे वाचा- इंग्रजी येत नसून बनले लोकप्रिय ZOOM अ‍ॅपचे सर्वेसर्वा,आज 48.44 हजार कोटी संपत्ती) याआधी देखील पेटीएम केवायसीच्या नावावर फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली होती. एवढच नव्हे तर कॉलवरून होणाऱ्या व्हेरिफिकेशन दरम्यान लिंक पाठवली जाते आणि त्या लिंकवर क्लिक करायला सांगून पैसे लंपास केले जातात. फिशिंगची अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुद्धा पेटीएमवरून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले होते. तेव्हा देखील संस्थापकांनी पेटीएमशी निगडीत बनावट फोन कॉल, एसएमएस अलर्टपासून सावधान राहण्याचा इशारा दिला होता. संपादन-जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या