नवी दिल्ली, 11 जानेवारी : जगभरातल्या अनेक देशांत स्वस्त हॉटेल रूम्स उपलब्ध करून देणारी ओयो (Oyo Hotels) ही कंपनी कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्ग या न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, ही कंपनी पुढच्या 3-4 महिन्यांत भारत आणि चीन या देशांतल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या तयारीत आहे. कंपनी सुमारे 1200 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये OYO कंपनीत सुमारे 12 हजार कर्मचारी काम करतात. तिथे आतापर्यंत 5 टक्के कर्मचारी कपात झाली आहे. त्याचवेळी भारतात काम करत असलेल्या 10 हजार कर्मचाऱ्यांपैकी 12 टक्के कर्मचाऱ्यांची कपात झाली आहे. ओयो कंपनीच्या सेल्स, सप्लाय आणि ऑपरेशन या विभागातल्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. त्याशिवाय आणखी 1200 कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. ओरावल ते ओयो ‘ओरावल’ या नावाने सुरू झालेल्या वेबसाइटलाच 2013 मध्ये OYO रूम्स असं नाव देण्यात आलं. रितेश अग्रवाल यांनी या कंपनीची सुरुवात केली होती. अगदी कमी काळात या स्टार्टअप कंपनीने मोठं यश मिळवलं आणि सॉफ्टबँकचा पाठिंबाही मिळाला. ‘ओयो’ ने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे, आमची कंपनी ही काम करण्यासाठी खूप चांगली जागा आहे. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीनुसार मूल्यांकन करून त्यांना नेहमीच रिवॉर्ड दिलं जातात. आम्ही आमची गुणग्राहकता जपली आहे. (हेही वाचा : आता पैसे भरण्यासाठी जावं लागणार नाही बँकेत, असा असेल हा नवा कॅश काउंटर) ‘ओयो’मध्ये सॉफ्टबँकने व्हिजन फंडच्या माध्यमातून 1.5 अब्ज डॉलरची (10,650 कोटी रुपये)गुंतवणूक केली आहे. कंपनीची एकूण किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्तच राहिली आहे. ओयो रूम्सकडे एक लाखांपेक्षा जास्त रूम्स आहेत.असं असलं तरीही मंदीच्या या काळात ओयो कंपनीलाही कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय. ================================================================================