JOIN US
मराठी बातम्या / मनी / ऑनलाईन गेमद्वारे दरवर्षी 80 हजार कोटींचा भारताला फटका; सरकार घेणार मोठा निर्णय

ऑनलाईन गेमद्वारे दरवर्षी 80 हजार कोटींचा भारताला फटका; सरकार घेणार मोठा निर्णय

गेमिंग वेबसाइटच्या माध्यमातून भारताचे 80 हजार कोटी रुपये परदेशात जात आहेत. यावर आता सरकार मोठा निर्णय घेणार आहे.

जाहिरात

ऑनलाईन गेमद्वारे दरवर्षी 80 हजार कोटींचा भारताला फटका

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑक्टोबर : तुम्ही जर ऑनलाईन गेम खेळत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, आता सरकार लवकरच त्याविरोधात कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. देशाबाहेरुन चालणाऱ्या ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराच्या वेबसाइटवर लवकरच मोठी कारवाई होणार आहे. सीएनबीसी आवाजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पोर्टलद्वारे पैसा थेट परदेशात जात आहे. यामुळे सरकारचे वर्षाला सुमारे 80 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. Dafa News, Dafa bet, 1xBet, Betway, Parimatch यांसारख्या सुमारे डझनभर वेबसाइट सरकारने पॉईंटआउट केल्या आहेत. हे सर्व दुबई, माल्टा आणि इतर टॅक्स हेवन देशांतून कार्यरत आहेत. देशातील राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये हे सर्वाधिक सक्रिय आहे. तामिळनाडू सरकारची ऑनलाइन जुगारावर बंदी अलीकडेच तामिळनाडू सरकारने राज्यात ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्यासाठी अध्यादेश जारी केला होता. या अध्यादेशाद्वारे ऑनलाइन गेमिंग प्राधिकरण स्थापन केले जाईल, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. तामिळनाडू सरकारच्या एका निवेदनात म्हटले आहे की, ऑनलाइन गेम आणि जुगारामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे अनेक जण आत्महत्या करत आहेत. गेमिंगच्या व्यसनामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे समाजव्यवस्थेवरही वाईट परिणाम झाला आहे. वाचा - NPS च्या ‘या’ खात्यात गुंतवणूक केल्यास टॅक्समधून मिळणार सूट? काय सांगतो नियम आता सरकार कठोर कारवाई पाऊल उचलणार या वेबसाइट्सचे दोन मोठे तोटे आहेत. पहिलं म्हणजे तरुणांना जुगाराची वाईट सवय लागली आहे. त्याचबरोबर सरकारचेही यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पोर्टल्सच्या माध्यमातून वर्षाला सुमारे 80 हजार कोटी रुपये परदेशात पोहोचत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हे पोर्टल भारतात कुठेही नोंदणीकृत नाही किंवा येथे कोणताही पत्ता नाही. पोर्टल ब्लॉक करण्याबरोबरच त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी परदेशी संस्थांचीही मदत घेतली जात आहे. त्यामुळे लवकर ऑनलाईन गेम बंद होण्याची शक्यता आहे. भारतातल्या कोट्यवधी तरुणाईला ऑनलाईन गेमिंगचं वेड लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या