JOIN US
मराठी बातम्या / मनी / Online Fraud : तुमच्या बँक अकाऊंटमधून बेकायदेशीररित्या पैसे गायब झाल्यास काय कराल?

Online Fraud : तुमच्या बँक अकाऊंटमधून बेकायदेशीररित्या पैसे गायब झाल्यास काय कराल?

बँक खात्यातून दुसऱ्याने पैसे काढले, तर सर्वप्रथम तुमच्या बँकेला कळवावे. असे कोणतेही प्रकरण 24 तासांच्या आत बँकेला कळवावे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून एक्झिक्युटिव्हकडे तक्रार नोंदवू शकता किंवा तुम्ही थेट बँकेत तक्रार करू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 डिसेंबर : टेक्नोलॉजी अॅडव्हान्स होत असल्याने आर्थिक फसवणुकीच्या (Financial Fraud) घटनाही वाढत आहेत. फसवणूक करणारे रोज नवनवीन पद्धती वापरून लोकांना लाखो रुपयांना गंडा घालत आहेत. कधी हे ठग लोकांना खात्याच्या e-KYC लिंकवर क्लिक करून मेसेजद्वारे फसवत आहेत, तर कधी लॉटरी किंवा बक्षिसे जिंकण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे. काही लोकांना त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीची आणि खात्यातून पैसे गहाळ झाल्याची माहिती बँकेत गेल्यानंतर कळते. जर कधी आर्थिक फसवणूक झाली, बँक खात्यातून (Bank Account) दुसऱ्याने पैसे काढले, तर सर्वप्रथम तुमच्या बँकेला कळवावे. असे कोणतेही प्रकरण 24 तासांच्या आत बँकेला कळवावे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून एक्झिक्युटिव्हकडे तक्रार नोंदवू शकता किंवा तुम्ही थेट बँकेत तक्रार करू शकता. त्यानंतर बँकेकडून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जाईल. फसवणूक झाल्यास पोलिसांत तक्रारही करावी. अशी प्रकरणे सायबर सेलच्या कक्षेत येतात. Bank of Baroda ने ग्राहकांना पाठवला अलर्ट! 1 फेब्रुवारीपासून लागू होतोय हा नियम चूक नसल्यास, तुम्हाला 72 तासांत रक्कम मिळू शकते नवभारत टाईम्स ने दिलेल्या वृत्तानुसार, जर बँकेला वेळेत माहिती दिली गेली आणि अशा व्यवहारांमध्ये बँक ग्राहकाची चूक नसेल, तर 72 तासांत पैसे खात्यात परत येऊ शकतात. सायबर तज्ज्ञ पवन दुग्गल यांच्या मते, सायबर फसवणूक रोखण्यासाठी सरकारने cybercrime.gov.in हे तक्रार पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर तुम्ही फसवणुकीची ऑनलाइन तक्रार करू शकता. याशिवाय सायबर क्राईमबाबत 155260 या हेल्पलाइन क्रमांकावरही तक्रारी करता येतील. OTP कोणालाही सांगू नका जर एखाद्याने फसवणुकीसाठी ओटीपी तयार केला आणि खातेदाराने त्याला ओटीपी सांगितला, तर ती खातेधारकाची चूक आहे. अशा परिस्थितीत बँक आर्थिक फसवणुकीची जबाबदारी घेणार नाही. परंतु जर एखाद्याने ग्राहकाच्या खात्यातून बेकायदेशीरपणे व्यवहार केला असेल किंवा पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड हॅक केले असेल किंवा फसवणुकीसाठी अशी कोणतीही पद्धत वापरली असेल ज्यामध्ये बँक ग्राहकाची कोणतीही भूमिका नसेल, तर ती खातेदाराची चूक मानली जाणार नाही. Home Loan घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, घर खरेदी करताना येणार नाहीत अडचणी बनावट स्वाक्षरी करून फसवणूक होत असल्यास जर कोणी तुमच्या बँक खात्यातून चेकद्वारे किंवा बनावट स्वाक्षरी करून पैसे काढले असतील, तर संबंधित क्षेत्रातील बँक शाखा आणि जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या