JOIN US
मराठी बातम्या / मनी / नेहमीच्या अभ्यासाचा कंटाळा आला? मग निवडा ही ऑफबीट करियर

नेहमीच्या अभ्यासाचा कंटाळा आला? मग निवडा ही ऑफबीट करियर

offbeat career - तुम्हाला काही तरी वेगळं शिकायचंय आणि लाखोंनी पैसेही मिळवायचेत. मग हे आहेत काही पर्याय

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जून : पारंपरिक करियर म्हणजे डाॅक्टर, इंजिनीयर, वकील, शिक्षक निवडणारे खूप आहेत. इतके आहेत की त्यामुळे 80 टक्के लोकांना नोकरी मिळतंच नाही. म्हणून हल्ली ऑफबीट करियर निवडण्याकडे कल असतो.  असे अनेक कोर्सेस आहेत जे खरोखर रंजक आहेत आणि त्यांना मागणीही असते. फॅशन स्टाइलिश - तुम्हाला कपड्यांची खूप आवड असेल तर तुम्ही फॅशन डिझायनर बनू शकता. पण तुम्हाला फॅशन डिझाइन आणि गारमेंट मॅनिफॅक्चरिंगमध्ये काही रस नसेल तर तुम्ही फॅशन स्टाइलिश बनू शकता. तुम्ही कधीही कोणाला तयार करू शकता. SBI ची बंपर ऑफर, Hyundai Venue बुक करा आणि ‘हे’ जिंका फूड स्टाइलिंग - तुम्हाला जेवण बनवायला आवडत असेल तर तुम्ही शेफ बनू शकता. पण फक्त खाण्यात रस असेल तर तुम्ही फूड स्टाइलिश बनू शकता. फूड स्टाइलिंगमध्ये जेवणाचा रंग, त्याची सजावट, प्लेटिंग, टेबल क्लाॅथ, कटलरी या गोष्टी येतात. फूड स्टाइलिशचं काम असतं पदार्थ, जेवण सुंदर करणं. ते प्रेझेंटेबल बनवणं. वेस्टर्न रेल्वेत 725 जागांवर भरती, ‘या’ उमेदवारांनी करावा अर्ज इंटिरियर स्टाइलिश - इंटिरियर डिझायनर तर बरेच जण होतात. पण इंटिरियर स्टाइलिश हे वेगळं प्रोफेशन आहे. त्यात तुम्ही घर कसं सजवायचं हे सांगता. कुठला रंग लावायचा, पेंटिंग, वस्तू कुठे ठेवायच्या ते सांगता. TRP मीटर : जाता जाता ‘लागीरं झालं जी’नं मारली बाजी रिलोकेशन स्पेशॅलिस्ट - परदेशातून भारतात येणाऱ्यांना अनेक गोष्टींची गरज असते. म्हणजे मुलांसाठी शाळा, कुठला क्लब जाॅइन करायचा. शाॅपिंग कुठे करायचं, फर्निचर कुठून खरेदी करायचं वगैरे. रिलोकेशन स्पेशॅलिस्ट त्यांना मदत करतं. ही करियर्स ऑफबीट आहेत. पण वेगळी वाट धरायची असेल तर हे चांगले पर्याय आहेत. VIDEO : मागासवर्गीय मुस्लीम आरक्षणाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री आणि अबू आझमी?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या