मुंबई, 14 सप्टेंबर : नॅशनल पेमेंट्स काॅर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)नं डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी मोठं पाऊल उचललंय. NPCIनं रुपे डेबिट कार्डावरून आर्थिक व्यवहार केला तर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR)मध्ये कपात केलीय. नवं एमडीआर 20 ऑक्टोबरपासून सुरू होतंय. रुपे डेबिट कार्डावरची सूट सर्व प्रकारच्या पाॅइंट ऑफ सेलवर लागू आहे. तसंच ई काॅम आणि भारतक्यूआर कोड आधारित मर्चंट आर्थिक व्यवहारावरही नवे दर लागू होतील. जास्तीत जास्त 150 रुपये घेतले जातील पाॅइंट ऑफ सेल, ईकाॅम आणि भारतक्यूआर कोडवरच्या देवाणघेवाणीबद्दल एमडीआरनं बदल केलाय. एमडीआर 2000 रुपयाहून अधिक व्यवहार झाला तर 0.60 टक्क्यापर्यंत पडतील. यात जास्तीत जास्त 150 रुपये प्रति देवाणघेवाण पडतील. आधार कार्डातल्या ‘या’ 6 गोष्टी बदलताना लागत नाहीत कुठलीच कागदपत्र NPCI च्या माहितीप्रमाणे एमडीआर दर कमी केल्यानं आणि जास्तीत जास्त सीमा कमी केल्यानं या डेबिट कार्डाचा वापर जास्त होऊ शकतो. या देशांमध्ये आहे रुपे कार्ड रुपे कार्ड भूतान, सिंगापूर या देशांमध्ये चालतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच संयुक्त अरब अमिरात इथे रुपे कार्ड सुरू केलंय. हे कार्ड 5 प्रकारात उपलब्ध आहे. क्लासिक डेबिट कार्ड, रुपे क्लासिक क्रेडिट कार्ड, रुपे प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आणि रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड. रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्डात बऱ्याच सुविधा दिल्या जातात. लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं महाग, ‘हे’ आहेत आजचे दर काय आहे RuPay कार्ड? रुपे शब्द दोन इंग्लिश शब्दांनी तयार झालाय. रुपये आणि पे. आता आपण विजा किंवा मास्टर डेबिट कार्ड वापरतो, त्याची पेमेंट पद्धत परदेशी आहे. त्याची फी द्यावी लागते. रुपे कार्ड इतर कार्डापेक्षा स्वस्त आहे. ते भारतानं बनवलंय. हे कार्ड इन्शुरन्सची रक्कमही देतं. हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये 9 पदांसाठी 164 व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज 2 लाख रुपयांचा इन्शुरन्स मोफत रुपे कार्डधारकांना अपघात विमा मिळतो. कार्डधारकाला 1 लाख रुपयांच्या इन्शुरन्स मिळतो. अपघातात शरीरातला अवयव निकामी झाला तर 1 ते 2 लाखांपर्यंत विमा मिळू शकतो. मृत्यू झाला तर तेवढे पैसे कुटुंबाला मिळतात. नैसर्गिक मृत्यूनंतर मात्र कुटुंबाला पैसे मिळत नाहीत. या माणसाला चहा-कॉफी किंवा तंबाखू नाही तर लागलंय भलतंच व्यसन, पाहा VIDEO