मुंबई, 8 नोव्हेंबर: तुमच्या घरात कुणी पेन्शनधारक व्यक्ती असेल किंवा तुम्ही स्वतः पेन्शनधारक असाल, तर पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागेल. पण आता तुम्ही घरबसल्या तुमच्या अँड्रॉईड फोनच्या मदतीनं तुमचं जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करू शकता. चे फेस रेकग्निशन पद्धतीनं तुम्ही तुमचं जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सहजपणं सबमिट करू शकता. ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र कसं सादर करायचं याची संपूर्ण माहिती आज आपण देणार आहोत. अँड्रॉइड फोनवरून असं जमा करा जीवन प्रमाणपत्र-
जर तुमच्याकडे अँड्रॉईड मोबाईल असेल तर तुम्ही मोबाईलवरूनही तुमचे जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही स्टेप्समध्ये फेस रेकग्निशन पद्धतीनं पेन्शनधारकाचं डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत. जेणेकरून पेन्शनधारकांना घरी बसून पेन्शनचा लाभ घेता येईल.
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये गुगल प्ले स्टोअर उघडावं लागेल. तुम्हाला तेथून आधार फेस आयडी अॅप (Aadhaar face ID app) डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही भारत सरकारच्या जीवन प्रमाणच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तेथून अॅप्लिकेशन डाउनलोड करू शकता.
अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्यात जी काही आवश्यक माहिती विचारली जाईल, ती भरावी लागेल. यासोबतच पेन्शनधारकाला त्याचा चेहरा स्कॅन करून ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या प्रक्रियेत, उपकरणाच्या मदतीनं, पेन्शनधारकास DLC जनरेशनसह प्रमाणीकृत केलं जातं.
पेन्शनधारकाच्या चेहऱ्याचा लाईव्ह फोटो डिव्हाईसच्या मदतीनं स्कॅन करावा लागेल. फोटो चांगल्या प्रकारे स्कॅन करण्यासाठी एक चांगली प्रकाश असलेली जागा वापरा. त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही दिलेल्या फोन नंबरवर एक मेसेज येईल, त्याशिवाय DLC डाउनलोड करण्याची लिंकही पाठवली जाईल. तेथून तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र सहज डाउनलोड करू शकाल.
ही सुविधा का सुरू केली? खरंतर निवृत्तीवेतनधारकांसाठी फेस रेकग्निशन सेवेची सुविधा आणण्यात आली आहे, कारण बहुतेक पेन्शनधारक हे त्या वयाचे आहेत जेथे त्यांना पेन्शन कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यातील अनेक पेन्शनधारकांची शारीरिक स्थितीही चांगली नसते. तसेच हे पेन्शनधारक आजारी असतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भारत सरकारनं आधार कार्डचा डाटाबेस वापरून पेन्शनधारकांसाठी फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी सुविधा सुरू केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.