JOIN US
मराठी बातम्या / मनी / PNB च्या नावात खरंच बदल झालाय का? बँकेकडून सोशल मीडियावर स्पष्टीकरण

PNB च्या नावात खरंच बदल झालाय का? बँकेकडून सोशल मीडियावर स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबीच्या (PNB)च्या नावामध्ये बदल होणार असल्याच्या चर्चा आहेत. नाव बदलण्यात येणार असल्याच्या चर्चांवर पंजाब नॅशनल बँकेने स्पष्टीकरण दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबीच्या (PNB)च्या नावामध्ये बदल होणार असल्याच्या चर्चा आहेत. नाव बदलण्यात येणार असल्याच्या चर्चांवर पंजाब नॅशनल बँकेने स्पष्टीकरण दिलं आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर जाहीर करण्यात आलं आहे की नाव बदलण्याबाबत कोणताही प्रस्ताव बँकेकडून मांडण्यात आलेला नाही. सोशल मीडियाच्या अधिकृत पेजवरुन जाहीर करण्यात आल्याने आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान पंजाब नॅशनल बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकांचं विलिनीकरण होणार आहे. या विलिनीकरणानंतर बँकेला कोणतं नाव देण्यात येणार याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. विलिनीकरणामुळे पंजाब नॅशनल बँकेची स्वत:ची ओळख नष्ट होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. तसंच बँकेचं नावही बदलण्यात येईल अशी चर्चा होती. त्यामुळे बँकेकडून सोशल मीडियावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या बँकांच्या विलीनीकरणानंतर तयार होणारी बँक भारतीय स्टेट बँकेनंतर देशातील दुसरी मोठी बँक असणार आहे. या बँकेतील संपूर्ण व्यवहार 18 लाख कोटी रुपयांचा असणार आहे. या बँकेतील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 1 लाख असेल. (हेही वाचा - टाटा-अदानी ट्रेन चालवण्याच्या रेसमध्ये! 100 मार्गांवर धावणार खासगी ट्रेन ) त्याचप्रमाणे कॅनरा बँकेसोबत सिंडीकेट बँकेचं विलिनीकरण होणार आहे. युनियन बँकेच्या आँध्रा बँकेचे विलिनीकरण कॉरपोरेशन बँकेसोबत होणार आहे. तर इंडियन बँक इलाहाबाद बँकेत विलिन होणार आहे. विलिनीकरणाचा ग्राहकांवर होणारा परिणाम ग्राहकांना नवा अकाउंट नंबर आणि कस्टमर आयडी मिळू शकतो. ज्या ग्राहकांना नवे अकाउंट नंबर किंवा IFSC कोड मिळतील त्यांना ही नवी माहिती इनकम टॅक्स, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, नॅशनल पेन्शन स्कीम या सगळ्या योजनांमध्ये अपडेट करावी लागेल. SIP किंवा कर्जाच्या हप्त्यांसाठी ग्राहकांना नवा इनस्ट्र्क्शन फॉर्म भरावा लागेल. नवं चेकबुक, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डही मिळू शकतं. एफडी किंवा आरडीवर मिळणाऱ्या व्याजात कोणतेही बदल होणार नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या