मुंबई, 26 मार्च : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात (Share Market) तेजी दिसून आली पण तरीही सेन्सेक्स आणि निफ्टी (Sensex-Nifty) त्यांच्या सर्वकालीन उच्चांकाच्या खाली आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी त्यांच्या सर्वकालीन उच्चांकाच्या 8 टक्के खाली व्यवहार करत आहेत. अशा स्थितीत लहान गुंतवणूकदारांना ही खरेदीची संधी असल्याचे वाटते. पण आता खरेदी करण्याची वेळ नाही, असं ऑनलाइन ब्रोकिंग फर्म Zerodha चे सह-संस्थापक आणि फंड मॅनेजमेंट हाऊस ‘True Beacon’ चे निखिल कामत (Nikhil Kamath) यांनी म्हटलं. आता बाजारात खरेदी करू नका, मोठी घसरण झाल्यानंतरच खरेदी करा, असा सल्ला निखिल कामत यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे. निखिल कामत यांना वाटते की गुंतवणूकदारांनी योग्य खरेदीच्या संधीसाठी थोडी प्रतीक्षा करावी कारण बाजाराचे सध्याचे मूल्यांकन अजूनही खूप जास्त आहे आणि ते आणखी घसरण्याची अपेक्षा आहे. निखिल कामत यांनी इकॉनॉमिक टाइम्सशी संवाद साधताना सांगितले की, जागतिक पातळीवरील भू-राजकीय संकटामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. सध्या ही आव्हाने पाहता खरेदी करण्याची ही कदाचित योग्य वेळ नाही. जर मी गुंतवणूकदार असतो, तर मी बाजार घसरण्याची वाट पाहिली असती. मग आजच्या तुलनेत खरेदीची चांगली संधी असेल. Tata ग्रुपची दमदार कामगिरी, 29 पैकी 12 स्टॉक्समध्ये 100 टक्क्यांहून अधिक रिटर्न; तुमच्याकडे आहेत का चलनवाढ हा बाजारासाठी सर्वात मोठा धोका यावेळी बाजारासाठी महागाई हा सर्वात मोठा धोका असल्याचे कामत यांचे मत आहे. रिझव्र्ह बँकेने महागाईचा सामना करण्याचा विश्वास वारंवार दाखवला आहे. मात्र, तरीही मध्यवर्ती बँक या प्रकरणात व्यवहारिक नसल्याचे कामत यांचे मत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीला सरकार नव्हे, तर ‘ही’ गोष्ट जबाबदार; नितीन गडकरींनी सांगितलं कारण फेब्रुवारीमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 6.07 टक्क्यांवर पोहोचला, जो सलग दुसऱ्या महिन्यात RBI च्या 4±2 टक्क्यांच्या पातळी ओलांडला. तेल कंपन्यांनी विधानसभा निवडणुकीमुळे फेब्रुवारी महिन्यात एकदाही दरवाढ न केल्याने कच्च्या तेलाच्या दरवाढीचा महागाईवर कोणताही परिणाम झालेला नसताना हा प्रकार घडला आहे. इंधनाचे दर पुन्हा वाढू लागल्याने मार्चपासून महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय तेल, साबण इत्यादी उत्पादन करणाऱ्या अनेक FMCG कंपन्यांनीही अलीकडे त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. याचा परिणाम महागाईच्या आकडेवारीवरही होणार आहे.