JOIN US
मराठी बातम्या / मनी / मास्क-सॅनिटायझरच्या खरेदीसाठी ही सरकारी कंपनी देणार कर्मचाऱ्यांना 1000 रुपये

मास्क-सॅनिटायझरच्या खरेदीसाठी ही सरकारी कंपनी देणार कर्मचाऱ्यांना 1000 रुपये

देशभरात कोरोनाचा (Coronavirus) चा प्रादुर्भाव वाढत असताना, मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी त्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जाहिरात

या मास्कची प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हा हवेतील 95% दूषित कणांपासून आपलं संरक्षण करतो. सर्जिकल मास्कपेक्षा हा मास्क जास्त प्रभावी असतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 मार्च : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) चा प्रादुर्भाव वाढत असताना, मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांमध्ये काही ठिकाणी तर मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी उपलब्ध ठिकाणी त्यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनएमडीसीने शनिवारी अशी माहिती दिली की त्यांच्या कंपनीकडून सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्कच्या खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. देशामध्ये कोरोना व्हायरसच्या संक्रमणात वाढ होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 300 हून अधिक झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये सॅनिटायझर आणि मास्कच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मात्र त्यांचा वापरही आवश्यक आहे. NMDC चे अध्यक्ष एन बैजेंद्र कुमार यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. (ही वाचा- कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी बाजारात नवीन नोटा? जाणून घ्या काय आहे SBI चा सल्ला ) कुमार यांनी माहिती दिली आहे की, एनएमडीसी कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी अस्थायी कर्मचारी, मजूर आणि प्रशिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना एक हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. कंपनीमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा आणि योजनांव्यतिरिक्त ही मदत करण्यात येणार आहे. (हे वाचा- येत्या 10 दिवसांत करून घ्या 5 महत्त्वाची कामं, अन्यथा भरावा लागेल 10 हजार दंड ) या ट्वीटबरोबरच त्यांनी एनएमडीसी कर्मचाऱ्यांसाठी एक अधिसूचना देखील पोस्ट केली आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एनएमडीसीमध्ये 5500 पगारधारी तर 2500 अस्थायी कर्मचारी आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या