नवी दिल्ली, 31 डिसेंबर : नव्या वर्षात बचतीचे प्लॅन असतील तर काही चांगले पर्याय आहेत. रोज 50 रुपये वाचवून तुम्ही 10 लाख रुपये मिळवू शकता. तुम्ही रोज 50 रुपयांची बचत कराल तर या महिन्यात 1500 रुपये होतील. तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये म्युच्युअल फंडाच्या योजनेत SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक 15 वर्षांपर्यंत करावी लागेल. बाजारात असे काही म्युच्युअल फंड आहेत की जे गेल्या 15 वर्षात 15 टक्के दराने चांगला फायदा मिळवून दिलाय. तुमच्याकडे 15 वर्षांनंतर 10 लाख रुपयांची रक्कम जमा होईल. तुम्हाला कसा होणार फायदा? तुम्ही जर म्युच्युअल फंड योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक 2 लाख 70 हजार रुपये असेल. त्याचवेळी तुमच्या SIP ची एकूण किंमत 10 लाख 2 हजार 760 रुपये होईल.म्हणजे तुम्हाला 7,32,760 रुपयांचा फायदा होईल. SIP हा चांगला मार्ग SIP हा म्युच्यअल फंडात गुंतवणूक करण्याचा चांगला मार्ग आहे. ज्या गुंतवणुकीत कमी धोका आहे त्यामध्ये बरा फायदा मिळतो. ही गुंतवणूक तुम्ही तुम्हाला वाटलं तर थांबवूही शकता. त्यासाठी कोणतीही पेनल्टी लागत नाही. हेही वाचा: वर्षअखेरीला सोनं आणि चांदी महागलं, हे आहेत आजचे दर तिमाहीसाठी व्याजदर छोट्या बचत योजनांवर सरकार तिमाही व्याजदर निश्चित करतं. सरकारने ऑक्टोबर डिसेंबर या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता. फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार सरकार जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांची घोषणा करेल. =============================================================================