JOIN US
मराठी बातम्या / मनी / New Labour Codes: आठवड्याला 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी; 23 राज्यांनी दिली सहमती, कधीपासून लागू होणार नवा कायदा?

New Labour Codes: आठवड्याला 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी; 23 राज्यांनी दिली सहमती, कधीपासून लागू होणार नवा कायदा?

New Labour Codes: आठवड्याला 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी; 23 राज्यांनी दिली सहमती, कधीपासून लागू होणार नवा कायदा?

जाहिरात

New Labour Codes Update: आतापर्यंत 23 राज्यांनी दर्शवली सहमती, नंतर आठवड्यातून 4 दिवस काम,3 दिवस विश्रांती!

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जुलै : सरकार १ जुलैपासून संपूर्ण देशात नवीन कामगार संहिता (New Labour Codes) लागू करणार होतं. मात्र काही राज्य सरकारांमुळे हे प्रकरण रखडले आहे. 23 राज्यांनी नवीन कामगार संहिता कायद्याचा पूर्व-प्रकाशित मसुदा स्वीकारला आहे. परंतु उर्वरित राज्यांनी अद्याप तो स्वीकारलेला नाही. सर्व राज्यांनी मिळून ही कामगार संहिता लागू करावी, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. नोकरदार लोकांसाठी चार मोठे बदल घडवून आणण्यासाठी सरकारने हे नियम बनवले आहेत. या 23 राज्यांनी दिली सहमती- नवीन कामगार संहितेला सहमती देणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, पंजाब, छत्तीसगड, त्रिपुरा, राजस्थान, झारखंड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, गोवा, मिझोराम, तेलंगणा, आसाम, मणिपूर, केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर, पुद्दुचेरी आणि दिल्लीचे GNCT इ.चा समावेश आहे. चार नवीन कोड- नवीन कामगार संहितेचा प्रभाव साप्ताहिक सुट्टीपासून (Weekly Holidays) इन हँड पगारापर्यंत (In Hand Salary) दिसून येईल. नवीन कामगार संहिता वेतन, सामाजिक सुरक्षा (Social Security), औद्योगिक संबंध (Industrial Relations) आणि व्यावसायिक सुरक्षितता (Occupational Safety) यांच्याशी संबंधित आहेत. आठवड्यातून 3 दिवस सुट्टी- नव्या लेबर कोडमध्ये चार दिवस काम आणि आठवड्यातून तीन सुट्या अशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढतील. याचा अर्थ असा की तुम्हाला 8 किंवा 9 तास नव्हे तर 12 तास ऑफिसमध्ये काम करावे लागेल. एका कर्मचाऱ्याला आठवड्याभरात 48 तास काम करावे लागेल. पण तुम्हाला तीन दिवसांची साप्ताहिक सुट्टी मिळेल. हेही वाचा:  UPI Payment Without Internet: टेन्शनच संपलं! इंटरनेटशिवायही करू शकता UPI पेमेंट; प्रोसेस आहे खूपच सोपी सुट्टीच्या बाबतीत मोठा बदल- नव्या कामगार संहितेत सुट्यांबाबत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. सध्या कोणत्याही संस्थेत दीर्घ रजा घेण्यासाठी कर्मचाऱ्याला वर्षातून किमान 240 दिवस काम करावे लागते. परंतु नवीन कामगार संहितेत ते 180 दिवस (6 महिने) करण्यात आले आहे. इन हँड पगारात कपात- नवीन वेतन संहिता लागू झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या खात्यात कमी टेक होम सॅलरी म्हणजेच हातातील पगार मिळेल. सरकारने पे रोलबाबत नवीन नियम केले आहेत. कर्मचाऱ्याचा मूळ पगार (Basic Salary) त्याच्या एकूण पगाराच्या (CTC) 50 टक्के किंवा त्याहून अधिक असावा, अशी तरतूद नव्या वेतन संहितेत करण्यात आली आहे. आता जर तुमचा मूळ पगार वाढला तर तुमचे पीएफ फंडातील योगदानही वाढेल. अशा परिस्थितीत पीएफमध्ये पूर्वीपेक्षा जास्त पैसे जमा होतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम मिळणार आहे. हेही वाचा:  सावधान! स्मार्टफोनमधील या 11 Apps मुळे तुमचं कुटुंब येऊ शकतं धोक्यात 48 तासांत पूर्ण सेटलमेंट- नवीन वेतन संहितेत पूर्ण आणि अंतिम सेटलमेंटबाबतही तरतूद करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांना नोकरी सोडल्यानंतर, बडतर्फी, छाटणी आणि कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांत त्यांचे वेतन दिले जाईल. सद्यस्थितीत, बहुतेक नियम वेतन देय आणि सेटलमेंटवर लागू आहेत. मात्र, यामध्ये राजीनाम्याचा समावेश नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या