मुंबई, 22 ऑक्टोबर : शेअर बाजारात (Share Market) यावर्षी आता पर्यंत अनेक कंपन्यांचे IPO आले आहेत. आता आजवरचा सर्वात महाग आयपीओ लवकरच शेअर बाजारात येत आहे. डिजिटल पेमेंट अँड फायनान्शियल सर्विसेस कंपनी पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सला (One97 Communications) 16,600 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी देशातील बाजार नियामक सेबीची (SEBI) मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, पेटीएम प्रायमरी सेलमध्ये 8300 कोटी रुपयांचे शेअरची विक्री करेल तर उर्वरित 8300 कोटी किमतीचे शेअर ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये विकले जातील. नोव्हेंबरच्या मध्यावर लिस्ट होण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीने जुलै महिन्यात आयपीओसाठी अर्ज सादर केला होता. वाचा- सरकारी बँकेत खातं असणाऱ्यांसाठी योजना; दरमाह 28 रुपयात मिळणार 4 लाखांचा फायदा, कसा? भारतीय इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ पेटीएमचा आयपीओ भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल. यापूर्वी हा विक्रम कोल इंडियाच्या नावावर होता. कोल इंडियाने एका दशकापूर्वी आपल्या आयपीओमधून सुमारे 15,000 कोटी रुपये उभारले होते. विजय शेखर शर्मा यांनी 2000 मध्ये One97 ची सुरुवात केली. सुरुवातीला कंपनी वॅल्यू अॅडेड सर्विस प्रोव्हाडर म्हमून सुरू झाली. नंतर ती ऑनलाईन मोबाईल पेमेंट फर्ममध्ये डेव्हलप झाली. 25 ऑक्टोबरपासून मोदी सरकार विकत आहे स्वस्त सोनं, ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट प्री-IPO शेअर सेल योजना रद्द होऊ शकते पेटीएम प्री-आयपीओ शेअर विक्रीची योजना रद्द करू शकते. इश्यू जारी करण्यापूर्वी प्री आयपीओ विक्रीतून 2000 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची आतापर्यंतची योजना होती. या प्रकरणाची माहिती असलेल्यांनी सांगितले की वॅल्युएशनच्या फरकामुळे कंपनी प्री आयपीओ विक्रीची योजना पुढे ढकलू शकते. इकोनॉमिक्स टाईम्सनुसार, सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की पेटीएम सध्या अॅडव्हायझर्सच्या मते 20 अब्ज डॉलर व्हॅल्युएशनची मागणी करत आहे. युनिकॉर्न ट्रॅकर CB Insights च्या मते, गेल्या वेळी कंपनीचे वॅल्युएशन 16 अब्ज डॉलर होते.