JOIN US
मराठी बातम्या / मनी / Pension Scheme: खासगी नोकरी करत असाल तरीही मिळेल पेन्शन; 'या' सरकारी योजनेचा घ्या फायदा

Pension Scheme: खासगी नोकरी करत असाल तरीही मिळेल पेन्शन; 'या' सरकारी योजनेचा घ्या फायदा

तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक NPS खात्यात पैसे जमा करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर 1,000 रुपयांमध्ये NPS खाते उघडू शकता. NPS खाते वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मे : निवृत्तीनंतर केवळ सरकारी नोकरांनाच पेन्शनचा लाभ मिळतो असं नाही, तुम्ही खासगी नोकरीत (Private Job) असाल किंवा कोणत्याही व्यवसायात असाल तर तुम्ही स्वत:साठीही निवृत्ती योजना (Pension Scheme) तयार करू शकता. भारत सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System) सुरू केली आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक प्रकारची पेन्शन तसेच गुंतवणूक योजना आहे. ही योजना बाजार आधारित परताव्याची हमी देते. NPS ही सरकारी गुंतवणूक योजना आहे. ही योजना 2004 मध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. 2009 पासून, ही योजना सर्व श्रेणीतील लोकांसाठी खुली करण्यात आली. कोणतीही व्यक्ती नोकरीच्या काळात पेन्शन खाते उघडू शकते. NPS मध्ये गुंतवणूक करण्याचे वय 18 ते 70 वर्षे आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्यात गुंतवणूक करू शकता. NPS ची खास गोष्ट म्हणजे तुम्ही निवृत्तीपूर्वीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत गुंतवलेल्या रकमेचा काही भाग तुम्ही निवृत्तीपूर्वी काढू शकता. तुम्ही निवृत्तीच्या वेळी एकूण ठेवीपैकी 60 टक्के रक्कम काढू शकता आणि उर्वरित 40 टक्के रक्कम पेन्शन योजनेत जाईल. या दरम्यान, जर तुम्हाला एनपीएस खाते बंद करायचे असेल, तर तुम्ही 3 वर्षांनंतर खाते बंद करू शकता. नवीन घर खरेदीदारांना झटका; HDFC बँकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी वाढ, EMI वाढणार तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक NPS खात्यात पैसे जमा करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर 1,000 रुपयांमध्ये NPS खाते उघडू शकता. NPS खाते वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते. नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत दोन प्रकारे खाती उघडली जाऊ शकतात. टियर-1 खात्यात जमा केलेले कोणतेही पैसे मुदतीपूर्वी काढता येत नाहीत. जेव्हा तुम्ही योजनेतून बाहेर असाल तेव्हाच तुम्ही पैसे काढू शकता. टियर-2 खाते उघडण्यासाठी, तुम्ही टियर 1 खातेधारक असणे आवश्यक आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पैसे जमा किंवा काढू शकता. प्रत्येकाने हे खाते उघडणे बंधनकारक नाही. New IPO : LIC नंतर ‘या’ 3 आयपीओंमधून गुंतवणूकदारांना कमाईची संधी, पुढील आठवड्यात ओपन होणार राष्ट्रीय पेन्शन योजनेचे फायदे » निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल. » Annuity च्या खरेदीत गुंतवणुकीत करातून पूर्णपणे सूट दिली जाईल. »कलम 80CCE अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त सूटचा दावा केला जाऊ शकतो. »राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत किमान गुंतवणूक मर्यादा 6000 रुपये आहे. » किमान गुंतवणूक न केल्यास, खाते गोठवले जाईल आणि 100 रुपये दंड आकारला जाईल. » जर गुंतवणुकदाराचा मृत्यू 60 वर्षापूर्वी झाला, तर नॉमिनीला पेन्शनची रक्कम दिली जाईल. » या योजनेत एकापेक्षा जास्त खाते उघडता येणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या