JOIN US
मराठी बातम्या / मनी / फळांच्या बॉक्समधून गुपचूप नेत होता परकीय चलन, कस्टम विभागाने असं पकडलं, पाहा VIDEO

फळांच्या बॉक्समधून गुपचूप नेत होता परकीय चलन, कस्टम विभागाने असं पकडलं, पाहा VIDEO

मुंबई विमानतळावरून दुबईला जाणारा एक तरुण अवैध पद्धतीने परकीय चलन घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : एका तरुणाने जे डोकं इथे लावलं तेच थोडं व्यावसायात लावलं असतं तर कुठच्या कुठे पोहोचला असता असं तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका तरुणाला परदेशी चलन गुपचूप घेऊन जाताना पकडलं आहे. त्याचा कारनामा पाहून एक क्षण कस्टम विभागाचे अधिकारी देखील अवाक झाले. मुंबई विमानतळावरून दुबईला जाणारा एक तरुण अवैध पद्धतीने परकीय चलन घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतक कस्टम विभागाचे अधिकारी अलर्टवर होते. त्यांनी तपासणी सुरू केली. एका फळांच्या बॉक्सच्याही आतल्या बाजूला नोटा लपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Thane Bus Accident : अंगावर शहारे आणणारा VIDEO, महिलेच्या अंगावरून गेली बस, ठाण्यातील घटना

हा बॉक्स जेव्हा अधिकाऱ्यांनी उघडला तेव्हा त्यामध्ये फळ दिसली. प्रथमदर्शनी त्यामध्ये संशयास्पद काहीच दिसत नव्हतं. मात्र जेव्हा बॉक्सला कटरने फाडून आतमध्ये लपलेल्या नोटा काढल्या तेव्हा मात्र उपस्थित लोक चक्रावले. जवळपास ही रक्कम 1.5 कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ला कोर्टाचा दिलासा, बेबी पावडर विक्रीला परवानगी, FDA ला धक्का

यामध्ये पाउंड, रियाल आणि दिराम असं महागडं चलन आहे. यापूर्वी अमृतसरच्या रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर असाच प्रकार समोर आला होता. त्यावेळी कस्टम विभागाने 65 लाख रुपयांचं सोनं जप्त केलं होतं. आता मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या