JOIN US
मराठी बातम्या / मनी / Multibagger share: दोन रुपयांच्या स्टॉकची मोठी झेप; एक लाख बनले 1.81 कोटी

Multibagger share: दोन रुपयांच्या स्टॉकची मोठी झेप; एक लाख बनले 1.81 कोटी

गेल्या 6 महिन्यांत Rama Phosphates शेअरची किंमत केवळ 8 टक्के वाढली असेल, परंतु गेल्या 1 वर्षात ती 108 रुपयांवरून 235 टक्क्यांनी वाढली आहे आणि 360 रुपयांच्या पुढे व्यवहार करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 फेब्रुवारी : गेल्या काही आठवड्यांपासून शेअर बाजारात (Share Market) मोठी अस्थिरता दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र आपण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांकडे (Long Term Investors) पाहिल्यास, बहुतेक अजूनही नफ्यात आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमधील काही शेअर्सनी आश्चर्यकारक परतावा दिला आहे. रामा फॉस्फेट्स (Rama Phosphates) हा देखील असाच एक स्टॉक आहे. गेल्या महिनाभरात या मल्टीबॅगर स्टॉकलाही विक्रीचा फटका बसला आहे. एकवेळी हा शेअर 400 रुपयांच्या जवळ पोहोचला होता. सध्या हा स्टॉक 360 रुपयांच्या आसपास खाली आला आहे. अशाप्रकारे, हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या 1 महिन्याच्या कालावधीत सुमारे 10 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, याआधी गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये या खत कंपनीच्या शेअरमध्ये 235 टक्क्यांनी वाढ झाली होती. या खत कंपनीच्या स्टॉकने दीर्घ मुदतीत सातत्याने उत्कृष्ट परतावा दिला आहे. Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील ‘या’ शेअरला BUY रेटिंग, चेक करा टार्गेट आणि स्टॉपलॉस गेल्या 6 महिन्यांत शेअरची किंमत केवळ 8 टक्के वाढली असेल, परंतु गेल्या 1 वर्षात ती 108 रुपयांवरून 235 टक्क्यांनी वाढली आहे आणि 360 रुपयांच्या पुढे व्यवहार करत आहे. दुसरीकडे, गेल्या 5 वर्षांच्या रेकॉर्डवर नजर टाकली, तर हा स्टॉक सुमारे 76 रुपयांपासून इथपर्यंत गेला आहे. या दरम्यान शेअरच्या किमतीत सुमारे 380 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Multi Option Deposit गुंतवणुकीचा उत्तम पर्याय, ATM मधूनही पैसे काढता येतील गेल्या 10 वर्षांचा विचार केल्यास हा शेअर 51 रुपयांवरून 360 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे 610 टक्क्यांनी झेप घेतली आहे. आजपासून सुमारे 19 वर्षांपूर्वी 13 मार्च 2003 रोजी हा स्टॉक BSE वर फक्त 2 रुपये होता. आज ते 360 रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे गेल्या 19 वर्षात या शेअरने सुमारे 18 हजार टक्के परतावा दिला आहे. यानुसार, ज्या गुंतवणूकदारांनी सुरुवातीच्या काळात त्याच्या शेअर्समध्ये पैसे टाकले, त्यांनी भरपूर पैसे कमावले असतील. 19 वर्षांपूर्वी, जर एखाद्याने या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचा पोर्टफोलिओ 1.81 कोटी रुपये झाला असता. त्याचप्रमाणे, ज्यांनी 10 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, त्यांची गुंतवणूक 7 लाखांपेक्षा जास्त असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या