मुंबई, 4 जानेवारी : मल्टीबॅगर स्टॉकसाठी 2021 हे वर्ष खूप चांगले आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना काही मल्टीबॅगर शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे. येथे आम्ही अशा काही मल्टीबॅगर स्टॉक्सबद्दल सांगत आहोत ज्यानी केवळ 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या स्टॉकमध्ये स्वस्तिक विनायक सिंथेटिक्स (Swastika Vinayaka Synthetics), स्वस्तिक विनायक आर्ट (Swastika Vinayak Art) आणि एचबी स्टॉकहोल्डिंग्सचा (HB Stockholdings) समावेश आहे. या मल्टीबॅगर स्मॉल स्टॉक्सची प्राईज हिस्ट्री पाहता, त्यांनी 2022 च्या फक्त दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये अप्पर सर्किट टच केला आहे. जर मागील 6 ट्रेडिंग सत्रांबद्दल बोलायचे तर या तीन पेनी स्टॉकने भागधारकांचे पैसे दुप्पट केले आहेत. Share Market Investment : यंदाच्या वर्षात या सेक्टरमध्ये बंपर कमाईची संधी, काय आहेत कारणं? वाचा सविस्तर स्वस्तिक विनायक सिंथेटिक्स जर तुम्ही या पेनी स्टॉकची प्राईज हिस्ट्री पाहिली तर, 27 डिसेंबर 2021 रोजी त्याचे शेअर्स 6.66 रुपयांवर बंद झाले. यानंतर, स्वस्तिक विनायक सिंथेटिक्सचे शेअर्स पुढील 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये 13.36 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच स्वस्तिक विनायक सिंथेटिक्सच्या शेअर्सने अवघ्या 6 दिवसांत 100 टक्के परतावा दिला आहे. स्वस्तिका विनायका आर्ट अँड हेरिटेज कॉर्पोरेशन हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 27 डिसेंबर 2021 रोजी 4.61 रुपयांवर बंद झाला. तर आज म्हणजेच 4 जानेवारी 2022 रोजी तो 9.25 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. गेल्या 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये याने 100 टक्के परतावा दिला आहे. तुमच्याकडेही असं PAN Card असेल तर भरावा लागेल 10 हजारांचा दंड, वाचा नियम एचबी स्टॉकहोल्डिंग्ज हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक गेल्या 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये 37.35 रुपयांवरून 75.05 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत कंपनीने 100 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. हा पेनी स्टॉक 27 डिसेंबर 2021 रोजी 37.35 वर ट्रेड करत होता आणि आज तो 75.05 च्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.