नवी दिल्ली 23 ऑगस्ट : फोर्ब्स दरवर्षी अब्जाधीशांची यादी जाहीर करते आणि ज्या शहरांमध्ये सर्वाधिक अब्जाधीश राहतात त्या शहरांची देखील यादी जारी केली जाते. जगातील अशी दहा शहरे, जिथे सर्वाधिक अब्जाधीश राहतात, त्यापैकी तीन एकट्या चीनमधील आहेत. या यादीत अमेरिकेतील दोन आणि भारतातील एका शहराचा समावेश आहे. DW हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियातील सोल शहर या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. 38 अब्जाधीशांनी या सुंदर शहराला आपले घर बनवले आहे, ज्यांची एकूण संपत्ती 108.3 अब्ज डॉलर आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे 45 अब्जाधीश राहतात, ज्यांची एकूण संपत्ती 162.3 अब्ज डॉलर आहे. सर्वाधिक अब्जाधीशांची वस्ती असलेल्या शहरांच्या यादीत ते नवव्या क्रमांकावर आहे. इलॉन मस्क यांचा पुणेकर मित्र पोहोचला थेट अमेरिकेत, कशी होती जगातील श्रीमंत व्यक्तीसोबतची भेट? या यादीत भारतातील मुंबई शहर आठव्या क्रमांकावर आहे. भारताच्या आर्थिक राजधानीत एकूण 51 अब्जाधीश राहतात आणि त्यांची एकूण संपत्ती 301.0 अब्ज डॉलर आहे. रशियातील मॉस्कोमध्ये 52 अब्जाधीश आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 217.5 अब्ज डॉलर आहे. सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या शहरांच्या यादीत मॉस्को सातव्या क्रमांकावर आहे. चीनच्या शेन्झेन शहरातही अनेक अब्जाधीश राहतात.येथे राहणाऱ्या अब्जाधीशांची संख्या 59 आहे आणि त्यांची एकूण संपत्ती 286.6 अब्ज डॉलर आहे. या यादीत हे शहर सहाव्या क्रमांकावर आहे. शांघाय हे अब्जाधीशांसह चीनचे दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि अब्जाधीशांची संख्या असलेले जगातील पाचवे शहर आहे. 61 अब्जाधीश आहेत ज्यांची एकूण संपत्ती 187 अब्ज डॉलर आहे.
Toll Naka: 12 तासात रिटर्न आल्यास टोल टॅक्स भरावा लागणार नाही! व्हायरल मेसेजवर सरकारने म्हटलं…
ब्रिटनच्या राजधानीत लंडनमध्ये 65 अब्जाधीश आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 323 अब्ज डॉलर आहे. या यादीत ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे. हाँगकाँगमध्ये 67 अब्जाधीश राहतात आणि फोर्ब्सच्या यादीत हाँगकाँग तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे राहणाऱ्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती 300.7 अब्ज डॉलर आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये अब्जाधीशांची संख्या 83 असून त्यांची एकूण संपत्ती 310 अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सच्या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात जास्त अब्जाधीश अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहतात. 106 अब्जाधीश आहेत ज्यांची एकूण संपत्ती 638.4 अब्ज डॉलर आहे.