JOIN US
मराठी बातम्या / मनी / Money Mantra: आज लक्ष्मीमातेला कमळाचं फूल अर्पण केलंत तर व्हाल मालामाल; असा असेल दिवस

Money Mantra: आज लक्ष्मीमातेला कमळाचं फूल अर्पण केलंत तर व्हाल मालामाल; असा असेल दिवस

भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

जाहिरात

आर्थिक राशिभविष्य.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (11 सप्टेंबर 2022) राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

मेष (Aries) : आरोग्याची काळजी घ्या. हवामानातल्या बदलामुळे आरोग्याची समस्या उद्भवेल. आजचा दिवस बिझनेसच्या अनुषंगाने सुखद असेल. घाई-गडबड टाळा. कुटुंबीयांसमवेत मौजमजेचा कालावधी व्यतीत कराल.

लकी नंबर : 4

लकी कलर : Purple

वृषभ (Taurus) : आजचा दिवस फायद्याचा आहे. आज रिस्क घेऊन नफा मिळेल. संयमाच्या आणि तुमच्या मृदू वर्तनाच्या साह्याने समस्या सोडवता येतील. समस्याग्रस्त, तणावातल्या व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल.

लकी नंबर : 7

लकी कलर : Green

उपाय : आईला काही तरी गोड खाऊ घाला.

मिथुन (Gemini) : महत्त्वाचे प्रलंबित निर्णय प्रलंबित ठेवू नका. हितचिंतकाच्या योग्य सल्ल्यांचा आदर कराल. आर्थिक मुद्द्यांमध्ये कृतिशीलता आणाल. सलोख्याने काम केल्यास अनपेक्षित नफा मिळू शकतो. तुमचं बजेट लक्षात घेऊन विचारपूर्वक, शहाणपणाने खर्च कराल.

लकी नंबर : 7

लकी कलर : Grey

उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा.

कर्क (Cancer) : नशिबाची मजबूत साथ राहील. करिअर बिझनेसमध्ये प्रगती होईल. नफा आणि प्रभाव यांमध्ये वाढ होईल. संतुलन साधाल. नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन चांगलं राहील. सहकारी जोडीदार बनतील. जोखीम घेण्याची क्षमता वाढेल. मोठे प्रयत्न केले जातील.

लकी नंबर : 5

लकी कलर : Light Red

उपाय : गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा.

सिंह (Leo) : कष्ट आणि समर्पण भावनेने काम यांमुळे कामाच्या ठिकाणी तुमचं स्थान निर्माण कराल आणि कायम राखाल. व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. अन्यथा आर्थिक तोट्याची शक्यता. बिझनेसमधला नफा चांगला राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

लकी नंबर : 3

लकी कलर : Blue

उपाय : श्री हनुमानाला नारळ अर्पण करा.

कन्या (Virgo) : कोणतंही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी तुमच्या प्रिय व्यक्तींशी चर्चा करा. कोणावरही खूप लवकर विश्वास ठेवू नका. अन्यथा तोटा होण्याची शक्यता. आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता असणं भविष्याच्या दृष्टीने उत्तम राहील. आरोग्याच्या बाबतीत तडजोड करू नका.

लकी नंबर : 1

लकी कलर : Green

उपाय : श्री दुर्गामातेला लाल ओढणी अर्पण करा.

तूळ (Libra) : खूप मोठ्या प्रयत्नांनी उद्योग-व्यवसायाचं स्थान मजबूत होईल. प्रिय व्यक्तींशी आणि वरिष्ठांशी भेट होईल. कुटुंबीयांचा सपोर्ट घरात राहील. जमीन-इमारत आदी बाबींमधून आर्थिक लाभांची शक्यता. उत्पन्नाचे स्रोत वाढतील.

लकी नंबर : 9

लकी कलर : Red

उपाय : छोट्या मुलींना खीर खाऊ घाला.

वृश्चिक (Scorpio) : परस्पर नातेसंबंध दृढ होतील. कामाच्या ठिकाणी नेतृत्वगुण वाढीला लागेल. त्यातून आर्थिक प्रगती होईल. दैनंदिन जीवनात नियम पाळा, शिस्त राखा. कुटुंबीयांना सपोर्ट मिळेल. पैसे मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करा.

लकी नंबर : 0

लकी कलर : Orange

उपाय : केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.

धनू (Sagittarius) : शहाणपणाने, विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्हाला यश नक्की मिळेल. खर्चांवर नियंत्रण ठेवा. अन्यथा कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल. तुम्ही ऊर्जा आणि उत्साहाने भारलेले असाल. मोठा विचार करा.

लकी नंबर : 8

लकी कलर : Golden

उपाय : सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या.

मकर (Capricorn) : भौतिक गोष्टींवर लक्ष असेल. अति हाव तुम्हाला कर्जाच्या खाईत लोटू शकते, हे लक्षात घ्या. पूर्ण विश्वास ठेवून कामं करा. कौटुंबिक प्रकरणांमध्ये प्रतिष्ठा जपली जाईल.

लकी नंबर : 2

लकी कलर : Purple

उपाय : लक्ष्मीमातेला कमळाचं फूल अर्पण करा.

कुंभ (Aquarius) : प्रत्येकाशी सलोखा वाढवणं करिअर आणि बिझनेसमध्ये फायद्याचं ठरेल. संवाद अधिक चांगला होईल. त्यातून पैसे मिळवण्याच्या आणखी संधी मिळतील. भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. भावा-बहिणींशी जवळीक वाढेल.

लकी नंबर : 6

लकी कलर : White

उपाय : तेलापासून तयार केलेली इमरती काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.

मीन (Pisces) : आज तुमचा आत्मविश्वास सर्वोच्च पातळीवर असेल. कुटुंबीयांचा पाठिंबा कायम राहील. सर्व बाजूंनी चांगल्या बातम्या मिळतील. आयुष्यात एक भव्यता अनुभवता येईल. संपत्ती प्रॉपर्टीच्या कामांशी संलग्न असेल. सर्वांमध्ये समानतेची भावना राखा.

लकी नंबर : 9

लकी कलर : Black

उपाय : शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तीची सेवा करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या