एसबीआय एफडी स्किम
SBI WeCare: तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि तुमची जमा पूंजी तुम्हाला गुंतवायची असेल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. भारतीय स्टेट बँकेने स्पेशल एफडी स्किम एसबीआय वीकेयरमध्ये गुंतवणूक करण्याची मुदत वाढवली आहे. आता या स्पेशल एफडी स्किममध्ये 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.
WeCare FD स्किम नवीन ठेव आणि मॅच्योरिटी ठेवीच्या रिन्युअलवर उपलब्ध आहे. सध्या, ठेवीदारांना या विशेष एफडी योजनेवर 7.50 टक्के व्याजदराचा लाभ दिला जातोय. या विशेष एफडी योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांच्या आत जास्तीत जास्त व्याजाचा लाभ मिळतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी, SBI ची VCare FD योजना एक उत्तम गुंतवणूक योजना ठरू शकते. Fixed Deposit : 400 दिवसांच्या स्पेशल FD वरुन कमाईची आणखी एक संधी! मिळेल जास्त व्याज SBI ने अमृत कलश एफडी योजनेची अंतिम तारीख देखील वाढवली आहे यासोबतच SBI ने अमृत कलश स्पेशल एफडी स्कीमची मुदतही वाढवली आहे. या योजनेंतर्गत, SBI ज्येष्ठ नागरिकांना आणि इतरांना इतर मुदतीच्या FD च्या तुलनेत सर्वाधिक व्याज देते. Bank Account: सेव्हिंग अकाउंट सुरु करावं की करंट अकाउंट? कुठे मिळतो जास्त फायदा? बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, अमृत कलश ठेव योजना आता 15 ऑगस्ट 2023 पर्यंत वैध असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना 400 दिवसांच्या अमृत कलश एफडी अंतर्गत 7.6 टक्के व्याज मिळू शकते. तर नियमित ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर 7.1 टक्के व्याज मिळू शकते.