मुंबई, 12 जुलै : देशातला सर्वात मोठा ई काॅमर्स प्लॅटफाॅर्म फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक आणि मास्टरकार्ड यांच्या सोबत क्रेडिट कार्ड लाँच करतंय. फ्लिपकार्टच्या नव्या क्रेडिट कार्डमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंगवर 5 टक्के कॅशबॅकबरोबर अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. याशिवाय ग्राहकांना अनेक सुविधा मिळतील. 500 रुपयांना मिळेल नवं क्रेडिट कार्ड फ्लिपकार्टच्या म्हणण्याप्रमाणे, नव्या कार्डासाठी ग्राहकांना रजिस्ट्रेशन दर म्हणून 500 रुपये द्यावे लागतील. वर्षाला 2 लाख रुपयाच्या खरेदीवर वर्षाचा चार्ज माफ केला जाईल. दर महिन्याला ग्राहकांच्या स्टेटमेंटमध्ये कॅशबॅक आॅटो क्रेडिट होईल. ‘या’ तारखेनंतर IT रिटर्न भरला तर ‘इतका’ पडेल दंड को-ब्रँडेट मर्चंटवर 5 टक्के कॅशबॅक फ्लिपकार्ट-अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे कंपनीचे को-ब्रँड मर्चंट फ्लिपकार्ट, Myntra आणि 2GUD इथून सामान खरेदी केलं तर ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. IPLचा ‘हा’ नियम वर्ल्ड कपमध्ये का नाही? विराटचा ICCला सवाल फ्लिपकार्ट-अॅक्सिस बँक यांनी थर्ड पार्टी मर्चंटसोबत भागीदारी केलीय. Make My Trip, Uber, PVR, Urban Clap, Curefit इथून तुम्ही काही खरेदी केली तर 4 टक्के कॅशबॅक मिळेल. इतर सर्व मर्चंटच्या खरेदीवर कार्डहोल्डरला 1.5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. Zomato डिलीव्हरी बॉयला रॉडने बेदम मारहाण, हॉटेल मालकाचा VIDEO व्हायरल आणखीही मिळेल फायदा फ्लिपकार्ट-अॅक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डावर वेल्कम बेनिफिट म्हणून ग्राहकांना को ब्रँडेड मर्चंट्स आणि थर्ड पार्टी प्लॅटफाॅर्ममधून खरेदी केली तर 3 हजार रुपये मिळतील. याशिवाय ग्राहकांना देशभरातल्या रेस्टाॅरंटमध्ये 20 टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल आणि 1.5 टक्के कॅशबॅक मिळेल. एवढंच नाही तर ग्राहकांना दर महिन्याला इंधनाच्या सरचार्जवर 1 टक्का म्हणजे 500 रुपये सूट मिळेल. हल्ली आॅनलाइन खरेदी करण्याचं प्रमाण वाढलंय. ती एक वेगळी बाजारपेठ झालीय. ई काॅमर्स कंपनीही ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा देण्यात आघाडीवर आहेत. कारण ई काॅमर्स कंपन्यांना त्यांच्यातल्या स्पर्धेमध्ये टाकून राहायचंय. VIDEO: भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी