नवी दिल्ली, 26 एप्रिल : जर तुमच्या घरी इंडेनचा गॅस सिलेंडर असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑईल आपल्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा देते. कंपनीने ट्विट करुन आपल्या ग्राहकांसाठी डीएसीबाबत माहिती दिली आहे. DAC नंबर आणि याचे फायदे आहेत. या नंबरद्वारे सिलेंडर घरी डिलिव्हर केला जातो. या नंबरची गरज सिलेंडर रिफील करण्यासाठी होते. IOC ने केलं ट्विट - इंडियन ऑईलने ट्विट करत, या नंबरबाबत माहिती दिली आहे. इंडेन सिलेंडर रिफीलसाठी बुक करताना नेहमी एक यूनिक DAC जनरेट होतो. डिलिव्हरी प्रोसेस पूर्ण करण्यासाठी डीएसी डिलिव्हरी बॉयला हा कोड देतात.
काय आहे DAC कोड? DAC म्हणजे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड आहे. ज्यावेळी सिलेंडर बुक केला जातो, त्यावेळी SMS द्वारे एक नंबर मिळतो. या नंबरचा वापर ओटीपी प्रमाणे केला जातो. ज्यावेळी कोणी तुमच्या घरी सिलेंडर देण्यासाठी येतं, त्यावेळी हा कोड त्या व्यक्तीला सांगावा लागतो. हा 4 अंकी कोड असतो. हा नंबर ग्राहकांच्या फोनवर एसएमएसद्वारे पाठवला जातो.
जर ग्राहकांकडे हा कोड नसेल, तर सिलेंडर मिळणार नाही. कोड मिळाल्यानंतरच सिलेंडर मिळेल. या कोडमुळेच सप्लायर्स सिलेंडर ब्लॅकमध्ये विकू शकत नाही. सिलेंडरच्या डिलिव्हरीवेळी हा कोड ग्राहकांना मिळतो.