JOIN US
मराठी बातम्या / मनी / कर्ज घेणे चांगलंही आणि वाईटही; तज्ज्ञांचं मत वाचा, कर्जबाजारी होण्यापासून नक्की वाचाल

कर्ज घेणे चांगलंही आणि वाईटही; तज्ज्ञांचं मत वाचा, कर्जबाजारी होण्यापासून नक्की वाचाल

कर्ज घेण्याचीअनेक कारणं असू शकतात. घर घेणे, शिक्षणासाठी, व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेणे योग्य आहे. मात्र चैनीच्या किंवा हौस भागवण्यासाठी कर्ज घेतल्यास तुम्ही अडचणीत सापडू शकता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 एप्रिल : खरं तर आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कुणालाच नको असतो; मात्र कित्येक वेळा गरज म्हणून कर्ज (Loan tips) घेण्याचा निर्णय घेतला जातो. कित्येक जण कर्ज घेणं चांगलं नसल्याचं म्हणतात. काही जण तर यामुळेच क्रेडिट कार्डही घेणं टाळतात; मात्र खरंच कर्ज घेणं ही चुकीची किंवा वाईट गोष्ट आहे का? याचं उत्तर खरं तर कर्ज घेण्याच्या कारणावर (reasons to take Loan) अवलंबून आहे. काही गोष्टींसाठी कर्ज घेणं ही नक्कीच वाईट (Is taking Loan a bad thing) गोष्ट असू शकते, तर काही गोष्टींसाठी कर्ज घेणंच योग्य ठरतं. मग आपण नेमकं कोणत्या परिस्थितीत कर्ज घ्यावं आणि कोणत्या परिस्थितीत टाळावं, याबाबत येथे माहिती देत आहोत. फायनान्शिअल एक्स्प्रेस ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पैसे वाढणार असतील, तर कर्ज चांगलं कर्जातून आलेल्या पैशांनी तुम्ही अशी काही गुंतवणूक वा वस्तू खरेदी करणार असाल, ज्यामुळे तुमचा पुढे फायदा होऊ शकतो, तर त्यासाठी कर्ज घेणं ही चांगली (When to take Loan) गोष्ट ठरू शकते. अशा एखाद्या गोष्टीसाठी कर्ज काढत असाल, जिची किंमत काळानुसार कमी-कमी होत जाईल तर ते नुकसानदायी (When to avoid taking loan) ठरू शकतं. त्यामुळे आपण कर्ज कशासाठी घेतोय याबाबत तुम्ही थोडा विचार केलात, तर कर्ज घ्यावं की नाही याबाबत निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. एज्युकेशन, होम आणि बिझनेस काही गोष्टी अशा आहेत, ज्यामध्ये आत्ता केलेली गुंतवणूक बऱ्याच कालावधीनंतर फलदायी ठरते. त्यामुळे या गोष्टींसाठी कर्ज घेणं ही अजिबात वाईट गोष्ट नाही. यामध्ये एज्युकेशन लोन, बिझनेस लोन आणि होम लोन आदींचा समावेश होतो. आपल्या किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज कधीही वाया जात नाही. कारण चांगल्या शिक्षणामुळेच पुढे चांगली नोकरी मिळून पैसे कमावता येऊ शकतात. अर्थात, त्यासाठी तुम्ही ज्या कोर्ससाठी कर्ज (Education Loan benefits) घेत घेत आहात, त्यात पुढे असलेल्या नोकरीच्या संधी, संभाव्य पगार आणि कर्जाची रक्कम यांची योग्य तुलना करूनच याबाबत निर्णय घेणं योग्य ठरेल. …तर बँकेकडून रोज तुम्हाला मिळतील 500 रुपये, RBI च्या नव्या गाईडलाईनमुळे ग्राहकांना मोठा दिलासा बिझनेसच्या बाबतीत एक वाक्य बरंच प्रसिद्ध आहे, ते म्हणजे ‘बिझनेस कधीही स्वतःच्या पैशांनी करायचा नसतो.’ त्यामुळे बिझनेस उभारण्यासाठी वा वाढवण्यासाठी कर्ज घेणं (Business Loan benefits) ही चुकीची गोष्ट नाही; मात्र त्यासाठी अगोदर चांगला बिझनेस प्लॅन हातात असणं गरजेचं आहे. अन्यथा बिझनेस बुडाल्यास डोक्यावर कर्जाचा डोंगर राहू शकतो. स्वतःचं घर असावं असं सगळ्यांचं स्वप्न असतं. कित्येक जण घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेतात. घरासाठी कर्ज घेणं ही चांगली बाब आहे; मात्र त्यासाठी तुमचा ईएमआय पुरेसा आहे की नाही हे आधी तपासून घेणं गरजेचं आहे. गृह कर्ज घेताना एक फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो म्हणजे, कर्जासाठीचा हप्ता हा तुमच्या एकूण पगाराच्या 40 टक्क्यांहून अधिक नसावा. गृहकर्जाचे बरेच फायदे (Benefits of Home loan) आहेत. एक म्हणजे यावर टॅक्समधून सूट मिळते, जो फायदा इतर प्रकारच्या कर्जांमध्ये सहसा मिळत नाही. तसंच भाड्याच्या घरात राहण्याऐवजी आपल्या स्वतःच्या घरात राहण्याचा आनंद घेता येतो. शिवाय, काही वर्षांनी ते घर विकण्याची गरज भासली, तरीही वाढलेल्या किमतींमुळे तुमचाच फायदा होतो. खाद्य तेलामुळे घराचं बजेड बिघडणार? तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता; काय आहेत कारणे काही कर्जं चांगलीही आणि वाईटही कर्ज घेण्यासाठीची काही चांगली कारणं आपण आतापर्यंत पाहिली; मात्र काही कारणांच्या बाबतीत तुम्ही पटकन चांगलं किंवा वाईट ठरवू शकत नाही. नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच या कर्जांबाबत दोन्ही बाजूंनी विचार करावा लागतो. यामध्ये तीन प्रकारच्या कर्जांचा समावेश होतो. त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे पर्सनल लोन. खासगी कर्जांचे व्याजदर होम लोन किंवा इतर कर्जांच्या तुलनेत अगदीच जास्त असतात. त्यामुळे या कर्जापासून दूर राहणंच सहसा चांगलं असतं; मात्र अगदी कमी कालावधीसाठी पर्सनल लोन (Personal loan) घेत असाल, तर मात्र हे कर्ज चांगलंही ठरू शकतं. तुम्ही या कर्जाचा वापर कसा करत आहात, यावर त्याची उपयुक्तता ठरते. म्हणजेच, कार लोन घेऊन एखादी नवी महागडी गाडी घेण्यापेक्षा, पर्सनल लोन घेऊन सेकंड हँड गाडी घेणं परवडू शकतं. अशाच प्रकारे बाकी गोष्टींबाबतही योग्य कॅल्क्युलेशन केल्यास पर्सनल लोनचाही फायदा तुम्ही करून घेऊ शकता. यामध्ये दुसरा मुद्दा आहे शेअर मार्केटचा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कित्येक जण कर्ज काढतात. बऱ्याच जणांना यात फायदाही होतो; मात्र शेअर बाजारात गुंतवणूक (Loan for Share market investment) करणं जोखमीचं असतं. त्यामुळे तुमचा चांगला अभ्यास नसेल वा मार्केट अचानक क्रॅश झालं, तर तुमची गुंतवणूक बुडून तुम्ही कर्जाच्या बोज्याखाली दबण्याची शक्यता असते. अनेक जण जुनं, जास्त व्याजदर असणारं कर्ज फेडण्यासाठी नवं कमी व्याजदराचं कर्ज घेतात. हे चांगलं ठरू शकतं; मात्र याबाबत निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही कर्जांचा व्याजदर, लोन ट्रान्सफरसाठी लागणारा खर्च आणि त्याबाबतच्या सर्व अटी (New Loan to clear off Old loan) याबाबत माहिती करून घेणं गरजेचं आहे. नव्या कर्जाची प्रोसेसिंग फी, जुन्या कर्जाचे फोर-क्लोजर चार्जेस या गोष्टींबाबत स्पष्टता असणं आवश्यक आहे. कित्येक बँकांचे टीजर रेट हे केवळ एका वर्षासाठी असतात. एका वर्षानंतर हे रेट वाढवलेही जाऊ शकतात. असं झाल्यास, नवीन कर्जालाही तुम्हाला पुन्हा जुन्याच प्रमाणात व्याजदर द्यावा लागू शकतो, शिवाय लोन ट्रान्स्फरवर खर्च केलेले पैसेही वाया जाऊ शकतात. तेव्हा ही सर्व जोखीम लक्षात घेऊनच याबाबत निर्णय घेणं योग्य ठरतं. या गोष्टींसाठी कधीही घेऊ नका कर्ज ज्या वस्तू अगदी गरजेच्या नसतात आणि काळानुसार त्यांची किंमत कमी होत जाते अशा कोणत्याही गोष्टीसाठी कर्ज घेणं सहसा टाळायला हवं. यातली पहिली गोष्ट म्हणजे कार! मध्यमवर्गीय व्यक्तीला माडी झाली की गाडीची ओढ लागते. अगदीच गरज असल्याशिवाय कर्ज काढून चारचाकी घेणं हा खरोखरच तोट्याचा सौदा ठरतो. कार घेतल्या दिवसापासून तिची किंमत कमी होऊ लागते. जोपर्यंत तुम्ही कर्ज फेडून गाडीचे मालक (Is Car Loan necessary) बनता, तोपर्यंत तर ती अगदीच कमी झालेली असते. त्यानंतर काही वर्षांतच तुम्हाला नवी गाडी घेण्याची गरज भासते आणि मग तुम्हाला परत पहिल्यापासून खर्च करावा लागतो. त्यामुळे कार लोन सहसा टाळणंच फायद्याचं ठरतं. गाडीव्यतिरिक्त महागडे कपडे, महागडे मोबाइल, महागडी घड्याळं आणि अशाच महागड्या चैनीच्या वस्तूंसाठी कर्ज घेणं तोट्याचं ठरतं. कारण या गोष्टींचे मूल्य दिवसेंदिवस कमी होत जातं. या गोष्टींमधून तुम्हाला रिटर्न काहीच मिळत नाही. उलट व्याजाच्या रूपात तुम्ही या वस्तूंच्या किंमतीपेक्षा अधिक रक्कम देत असता. त्यामुळे अशा वस्तूंसाठीही कर्ज घेणं टाळता आल्यास उत्तम.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या