ट्विटरच्या नवीन सीईओ
नवी दिल्ली, 13 मे: ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कमान आता एका महिलेच्या हातात असणार आहे. ट्विटरचे मालक आणि अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी ही घोषणा केली. त्यांनी ट्विट केले की, लिंडा यासारिनो ट्विटरच्या नवीन सीईओ असतील. ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलन मस्क यांनी तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांना डिस्चार्ज केले होते आणि ते स्वत: या पदावर होते. यासारिनो या मस्क यांच्या जुन्या फ्रेंड आहेत. सध्या त्या NBCUniversal Media या जागतिक जाहिरात कंपनीच्या चेअरमन आहेत. लिंडाच्या नियुक्तीची घोषणा करताना, एलन मस्क यांनी ट्विटरवर लिहिले, ‘ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा यासारिनो यांचे स्वागत करताना मी उत्साहित आहे!’ ते म्हणाले की, लिंडा प्लॅटफॉर्मच्या बिझनेस ऑपरेशंसवर फोकस करतील. एलन मस्क स्वतः प्रोडक्ट डिझाईन आणि नवीन टेक्नॉलॉजीशी संबंधित काम सांभाळतील. दोन दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी ट्विट केले होते की, 6 आठवड्यांत ट्विटरला नवीन सीईओ मिळेल आणि एक महिला या पदाची सूत्रे हाती घेईल. तेव्हा त्यांनी सीईओचे नाव सांगितले नव्हते. पण, लिंडा यासारिनो या पदाची सूत्रे स्वीकारतील, असा अंदाज बांधणे सुरुच होते.
Bank Account: एका सामान्य व्यक्तीचे किती बँक अकाउंट असावेत? काय सांगतो नियम?लिंडा यासारिनो ही पेन स्टेट युनिव्हर्सिटीची माजी विद्यार्थी आहे. ती NBC युनिव्हर्सलमध्ये जवळपास एक दशकापासून काम करतेय. जाहिरातींचे परिणाम मोजण्यासाठी उत्तम पर्याय शोधण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे. यासोबतच त्या अॅड सेल्समध्येही कुशल आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका रिपोर्टनुसार, यासारिनो आणि त्यांच्या टीमने आतापर्यंत अॅड सेल्समधून 100 बिलियन डॉलरपेक्षा अधिक कमाई केली आहे. यासोबतच त्या राष्ट्रीय आणि स्थानिक लोकल अॅड सेल्स, पार्टनर्शिप, अॅड टेक डेटा मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजिक इनेशिएटिव्हमध्येही पारंगत आहेत. लिंडा यासारिनो यांनी टर्नर येथे 19 वर्षे काम केले आहे. त्यांनी टर्नर सोडले तेव्हा त्या ऐडव्हर्टायझिंग सेल्स, मार्केटिंग आणि अधिग्रहणाच्या व्हाइस प्रेसीडेंट होत्या.
आयआयटीयन तरुणाची कमाल! पठ्ठ्याने लॉन्ड्रीमधून उभा केला 100 कोटींचा व्यवसाययास्रीनोसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. ट्विटरमधील त्याचा मार्ग अजिबात सोपा नाही. कारण कंपनीच्या कमाईमध्ये सातत्याने घट होत आहे. जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्नही कमी झालेले आहे. गेल्या सात महिन्यांत कंपनीच्या उत्पन्नात 50 टक्क्यांनी घट झाल्याची पाहायला मिळालं. गेल्या महिन्यात एलन मस्क आणि लिंडा यासारिनो यांना मियामी येथे झालेल्या एका की-नोट कॉन्फरन्समध्ये एकत्र दिसले होते. यानंतरच NBCUniversal आणि Twitter यांच्यात जाहिरातीचा करार झाला.