मुंबई, 19 नोव्हेंबर : कोरोना काळात लाईफ इन्शुरन्स (Life Insurance), हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance) यांचं महत्व लोकांना चांगलंच पटलंय. त्यामुळे इन्शुरन्स काढणाऱ्यांची संख्याही काही प्रमाणात वाढली आहे. मात्र या सर्वांना पुढील वर्षापासून इन्शुरन्ससाठी अधिकचे पैसे (Extra Premium) भरावे लागण्याची शक्यता आहे. लाईफ इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम पुढील वर्षी म्हणजे 2022 पासून वाढू शकते. एका अहवालानुसार, रिइन्शुरन्स कंपन्या (Insurance Companies) पुढील वर्षापासून त्याचे शुल्क वाढवणार आहेत, ज्याचा भार इन्शुरन्स कंपन्यांकडून त्यांच्या ग्राहकांवर पडू शकतो. रिइन्शुरन्स म्हणजे एकप्रकारे इन्शुरन्स कंपन्यांसाठी इन्शुरन्स असतो. इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या विविध प्रकारच्या जोखीम कव्हर करण्यासाठी रिइन्शुरन्स कंपन्यांना शुल्क देतात. प्रीमियमची रक्कम वाढवून इन्शुरन्स कंपन्यांचा नफाही वाढू शकतो. मात्र यामुळे पॉलिसीची मागणी कमी होऊ शकते. विशेषतः अशा वेळी जेव्हा इन्शुरन्स प्रोडक्ट्सबद्दल जागरूकता वाढत आहे. IPO मध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या 5 गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान प्रीमियम 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम 20 ते 40 टक्क्यांच्या दरम्यान वाढू शकते. कारण गेल्या काही काळापासून रिइन्शुरन्स कंपन्यांना अधिक प्रमाणात इन्शुरन्स क्लेम (Insurance Claim) मिळत आहेत, त्यामुळे त्यांचा तोटा वाढला आहे. अशा परिस्थितीत हा तोटा भरून काढण्यासाठी ते आता फी वाढवणार आहेत. अनेक कंपन्यांनी यापूर्वीच भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कडे शुल्क वाढवण्याची परवानगी मागितली आहे. तर काही कंपन्या किमान दरवाढ ठेवण्यासाठी ग्लोबल रिइन्शुरन्स कंपन्यांशी चर्चा करत आहेत. प्रीमियमच्या वाढीमुळे पॉलिसीच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन विक्रीवर परिणाम होऊ शकतो. Paytm च्या शेअर्समुळे गुंतवणूकदार पहिल्या दिवशी निराश; पुढे काय करायचं तज्ज्ञांचं मत काय? तज्ञांच्या मते, गेल्या 6 महिन्यांपासून किमती वाढवण्याबाबत चर्चा होत होती आणि आता ती टाळता येणार नाही. कोरोनामुळे काही काळ इन्शुरन्स क्लेम वाढले आहेत. त्यामुळे रिइन्शुरन्स कंपन्यांचे नुकसान झाले आहे आणि आता ते त्यांचे शुल्क वाढवत आहेत.