मुंबई, 6 जून : एलआयसीच्या शेअर (LIC Share) बाजारात धमाकेदार एन्ट्री झाली होती. एलआयसीचा शेअर लिस्टिंग आधी प्रचंड चर्चेत होता. अनेकांना या शेअरमध्ये गुंतवणूक (Share Market Investors) करायची होती. मात्र ज्यांना या शेअरमध्ये गुंतवणूक करता आली नाही ते आज खूश आहेत, तर ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली ते चिंतेत आहेत. एलआयसी शेअर शेअर्समध्ये पहिल्या दिवसापासून असलेली घसरण सुरूच आहे. सध्या गुंतवणूकदारांना या शेअरच्या रिकव्हरीची कोणतीही आशा दिसत नाही. त्यामुळेच आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी एलआयसीचा शेअर 800 रुपयांच्या खाली गेला. एलआयसीच्या शेअरमध्ये आज 2.97 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. हा शेअर आज 776.50 रुपयेवर बंद झाला. लिस्टिंगनंतर सातत्याने घसरत असलेल्या देशातील या सर्वात मोठ्या विमा कंपनीची मार्केट कॅप (LIC Market Cap) 5 लाख कोटी रुपयांच्या खाली आले. सध्या त्याचे मार्केट कॅप 4.92 लाख कोटी रुपये झाली आहे. जेव्हा सरकारने LIC चा IPO आणला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप अंदाजे 6 लाख कोटी रुपये होती. अशाप्रकारे आतापर्यंत गुंतवणूकदारांचे LIC शेअर्समध्ये सुमारे 1.8 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. नोटांवरील महात्मा गांधी यांचा फोटो बदलण्याच्या बातम्यांवर RBI ची महत्वाची माहिती लिस्टींग झाल्यापासून एलआयसीच्या शेअरमध्ये (LIC Share Price Today) घसरण सुरूच आहे. सोमवारी 6 जून रोजी हा स्टॉक प्रथमच 800 रुपयांच्या खाली आला. शेअर 949 रुपयांच्या इश्यू किमतीपासून आतापर्यंत 17 टक्क्यांनी घसरला आहे. एलआयसी पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. कंपनीने पॉलिसीधारकांना प्रति शेअर 60 रुपये सूटही दिली होती. पॉलिसीधारक कॅटगरी सर्वाधिक सहा पट सबस्क्राईब झाली होती. पण एलआयसीच्या शेअरने आतापर्यंत गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. शेअर बाजारातील एलआयसीच्या या स्थितीचा कदाचित कुणी विचारही केला नसेल. येत्या काळात एलआयसीच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होऊ शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचे कारण म्हणजे अँकर गुंतवणूकदारांचा लॉक-इन कालावधी 13 जून रोजी संपणार आहे. याचा अर्थ यानंतर ते एलआयसीचे शेअर्स विकू शकतील. जर अँकर गुंतवणूकदारही सेलर झाले तर एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होऊ शकते. ‘पोस्टमन काका’ आता जनतेचा ‘आधार’ बनणार; काय आहे UIDAI ची योजना? आता गुंतवणूक टाळा बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की सध्या नवीन गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे टाळावे. याचे कारण सध्या या शेअरला आधार देणारा कोणताही घटक नाही. ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये शेअर अलॉट झाले आले त्यांनी ते होल्ड करावेत.