JOIN US
मराठी बातम्या / मनी / LIC IPO : 29 कोटी पॉलिसीधारक, 11 लाख एजंट्स; शेअर बाजाराची चमक वाढवू शकतो एलआयसी आयपीओ

LIC IPO : 29 कोटी पॉलिसीधारक, 11 लाख एजंट्स; शेअर बाजाराची चमक वाढवू शकतो एलआयसी आयपीओ

LIC मध्ये सध्या सरकारची 100 टक्के हिस्सेदारी आहे. लिस्टिंगनंतर एलआयसीचे वॅल्युएशन 13-15 लाख कोटी रुपये अपेक्षित आहे. अशा प्रकारे एलआयसी देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या क्लबमध्ये सामील होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 फेब्रुवारी : भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) IPO पुढील महिन्यात येणार आहे. कंपनी IPO मधून 70,0000 ते 1,00,000 कोटी रुपये उभारू शकते. कंपनीमध्ये सध्या सरकारची 100 टक्के हिस्सेदारी आहे. लिस्टिंगनंतर एलआयसीचे वॅल्युएशन 13-15 लाख कोटी रुपये अपेक्षित आहे. अशा प्रकारे एलआयसी देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या क्लबमध्ये सामील होईल. हा IPO भारतीय शेअर बाजारासाठी अनेक अर्थांनी खास आहे. 29 कोटींहून अधिक ग्राहक LIC ची स्थापना 1888 मध्ये झाली. सध्या त्याच्या पॉलिसीधारकांची संख्या 29 कोटी आहे. कंपनी आपल्या पॉलिसीधारकांसाठी शेअर राखून ठेवण्याची योजना आखत आहे. ज्या पॉलिसीधारकांची पॉलिसी त्यांच्या पॅनकार्डशी लिंक केली जाईल त्यांना याचा लाभ मिळेल. कंपनी त्यांना किंमतीत सूट देऊ शकते. एलआयसीचे 11 लाख एजंट LIC चे देशभरात 8 झोनल कार्यालये आहेत, ज्या अंतर्गत 113 विभागीय कार्यालये येतात. एलआयसीचे देशभरात 11.48 लाख एजंट आहेत. त्याच्या 2000 हून अधिक शाखा आहेत. एलआयसी 57,780 कोटी रुपयांचे सरप्लस जनरेट करते. यापैकी 2,889 कोटी रुपये लाभांश म्हणून सरकारला अदा करण्यात आले आहेत. 98 टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट रेशो LIC चे क्लेम सेटलमेंट रेशो 98.27 टक्के आहे. एवढ्या जुन्या आणि एवढ्या मोठ्या कंपनीचे इतके हाय क्लेम सेटलमेंट रेशो तिच्या कामकाजाचा दर्जा सांगते. त्याचे सॉल्व्हेंसी रेशो 176 टक्के आहे, जे निर्धारित बेंचमार्क 150 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. एकूण गुंतवणुकीवर एलआयसीचा एनपीए 7.78 टक्के आहे. वाढीसाठी मोठी क्षमता भारतातील लाइफ इन्शुरन्स उद्योगामध्ये वाढीची मोठी क्षमता आहे. सध्या लोकसंख्येचा मोठा भाग जीवन विमा पॉलिसीपासून दूर आहे. जीवन विमा उद्योगाची वार्षिक वाढ 22.5 टक्के आहे. एलआयसीचा गुंतवणुकीवरील परतावा देखील इतर जीवन विमा कंपन्यांपेक्षा चांगला आहे. शेअर बाजारांची चमक वाढू शकते LIC च्या IPO मुळे भारतीय शेअर बाजारांची चमक वाढेल अशी अपेक्षा आहे. याचे कारण म्हणजे सीडीसीएलकडे सध्या 5 कोटींहून अधिक डिमॅट खाती आहेत. LIC पॉलिसीधारकांची संख्या 29 कोटींहून अधिक असल्याने, डिमॅट खात्यांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. एलआयसीच्या बोर्डाने शुक्रवारी आयपीओच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मसुदा दस्तऐवजात किरकोळ बदल करण्यास सांगितले आहे. पुन्हा 15 सदस्यीय मंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये ड्राफ्ट हेरिंग प्रॉस्पेक्टसला मंजुरी मिळेल. पुढील आठवड्यात सोमवारपर्यंत LIC SEBI कडे प्रॉस्पेक्टस पाठवेल अशी अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या