मुंबई, 14 फेब्रुवारी : देशातील सर्वात मोठा IPO आणण्याच्या तयारीत असलेली LIC छोट्या गुंतवणूकदारांवर मोठी मेहरबानी करताना दिसू शकेल. कंपनीने रविवारी बाजार नियामक सेबीला सादर केलेल्या ड्राफ्टमध्ये म्हटले आहे की तिच्या एकूण इक्विटी शेअर्सपैकी 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. LIC ने आपल्या ड्राफ्ट पेपरमध्ये म्हटले आहे की IPO च्या माध्यमातून जवळपास 31.62 कोटी इक्विटी शेअर बाजारात लॉन्च केले जातील. यापैकी 35 टक्के म्हणजे सुमारे 11 कोटी इक्विटी शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येतील. किरकोळ गुंतवणूकदारांनी गेल्या दीड वर्षांपासून आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यासाठी दाखवलेला उत्साह लक्षात घेऊन कंपनीने ही रणनीती आखली आहे. सरकारलाही करातून उत्पन्न मिळेल अगदी कमी कालावधीत सुमारे 1 कोटी डिमॅट खाती उघडण्यात आल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावरून LIC च्या IPO बद्दल गुंतवणूकदार किती उत्सुक आहेत हे दिसून येते. जर यापैकी 10 टक्के गुंतवणूकदारांनीही IPO साठी बोली लावली आणि शेअर्स वाटप केले तर सरकारला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) द्वारे बम्पर कमाई होईल. Petrol Diesel Prices Today: मुंबईत काय आहे आजचा पेट्रोल-डिझेल दर, पाहा लेटेस्ट रेट LIC ने पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) एकूण ऑफर साईजच्या 50 टक्के शेअर्स राखीव ठेवले आहेत. याशिवाय 15 टक्के रक्कम गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना (NII) दिली जाईल. इतकेच नाही तर QIBs चा 60 टक्के हिस्सा अँकर गुंतवणूकदारांना देण्यासही तयार आहे, जो कंपनीच्या आयपीओचा आधार असेल. यातील सुमारे 33 टक्के रक्कम देशांतर्गत म्युच्युअल फंड कंपन्यांना दिली जाईल. Rakesh Jhunjhunwala यांचं एकाच दिवसात 426 कोटींचं नुकसान; ‘हे’ शेअर ठरले कारणीभूत पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांसाठीही हिस्सा SEBI कडे सादर केलेल्या प्रॉस्पेक्टसनुसार, जास्तीत जास्त 10 टक्के इश्यू पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. कोणत्याही परिस्थितीत हा वाटा 10 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. तुमची एलआयसी पॉलिसी संपली असली तरीही तुम्ही राखीव कोट्यावर बोली लावू शकता. LIC कर्मचाऱ्यांसाठी 5 टक्के हिस्सा राखीव असेल. मात्र, हा इश्यू बाजारात उघडल्यानंतरच सवलतीचा खुलासा केला जाईल.