JOIN US
मराठी बातम्या / मनी / BREAKING : अखेर ठरलं! LIC चा IPO 4 मे रोजी होणार लाँच

BREAKING : अखेर ठरलं! LIC चा IPO 4 मे रोजी होणार लाँच

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC च्या मेगा IPO ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत होते

जाहिरात

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC च्या मेगा IPO ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत होते

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 एप्रिल : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC च्या मेगा IPO ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत होते अखेर त्याची प्रतिक्षा आता संपली आहे.  एलआयसीचा आयपीओ हा 4 मे रोजी लाँच केला जाणार आहे. LIC मधील पाच टक्के भागभांडवल किंवा 31.6 कोटी शेअर्सची विक्री यापूर्वी मार्चमध्ये होणार होती परंतु भू-राजकीय तणावामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे नवीन कागदपत्रे दाखल न करता LIC चा IPO आणण्यासाठी सरकारकडे 12 मे पर्यंत वेळ मागितला होता. पण, आता 4 मेच्या तारखेवर शिक्कामोर्तब झाले आहे. आता सरकार LIC मधील 3.5 टक्के शेअर्स 21,000 कोटी रुपयांना विकणार आहे, हे नियामक मान्यतेच्या अधीन असेल. एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उघडणाऱ्या IPO दरम्यान सरकारी हिस्सेदारी विक्रीतून सुमारे 21,000 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. त्याच्या इश्यूसाठी, LIC बुधवारपर्यंत बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे अंतिम मंजुरी अर्ज दाखल करू शकते. ( आतापर्यंत ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही, अशांसाठी चिंताजनक वृत्त! ) एलआयसीने गेल्या फेब्रुवारीमध्ये सेबीकडे ड्राफ्ट इश्यू डॉक्युमेंट दाखल केले होते. त्यावेळी एलआयसीने सांगितले होते की, सरकार या विमा कंपनीतील 5 टक्के स्टेक म्हणजेच 316 कोटी शेअर्स विकणार आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे एलआयसीचा आयपीओ काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला. बदललेली परिस्थिती पाहता सरकारला इश्यूचा आकार 3.5 टक्क्यांपर्यंत खाली आणणे भाग पडले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या