JOIN US
मराठी बातम्या / मनी / चांगल्या कमाईसाठी करू शकता हा व्यवसाय, 50 हजारात घरातूनच सुरू करता येईल

चांगल्या कमाईसाठी करू शकता हा व्यवसाय, 50 हजारात घरातूनच सुरू करता येईल

तुम्हीही नोकरी करता करता एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कमी भांडवलमध्ये सुरू होणार हा व्यवसाय सध्या डिमांडमध्ये असून यातून मोठी कमाईही होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 मे : काही लोकांना नोकरीसह व्यवसायही करण्याची आवड असते किंवा गरज भासते. तुम्हीही नोकरी करता करता एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कमी भांडवलमध्ये सुरू होणार हा व्यवसाय सध्या डिमांडमध्ये असून यातून मोठी कमाईही होत आहे. हा व्यवसाय आहे LED बल्ब (LED Bulb) बनवण्याचा. कमी जागेतही तुम्ही घरबसल्या या व्यवसायाची सुरुवात करू शकता. 50000 रुपयांत हा व्यवसाय सुरू करता येईल. सरकारकडून मिळेल सब्सिडी - सरकारकडून अनेक व्यवसाय सुरू करताना सब्सिडी दिली जाते. हा व्यवसायही असाच आहे. यात सरकारकडून व्यवसायासाठी प्रोत्साहित केलं जातं. या व्यवसायासाठी सरकारकडून सब्सिडी मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडील केवळ 50000 रुपयांची रक्कम गुंतवावी लागेल. एक एलईडी बल्ब तयार करण्यासाठी 40 ते 50 रुपये लागतात. बाजारात हा बल्ब 80 ते 100 रुपयांत विक्री होतो. समजा तुम्ही काम लहान लेवलवर सुरू केलं आहे, आणि तुम्ही दिवसाला 100 बल्बची विक्री करता, तर तुम्हाला 4 ते 5 हजार रुपयांचं इन्कम सुरू होईल.

हे वाचा -  233 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळतील 17 लाख रुपये, टॅक्समध्ये सूट; वाचा आहे सुरक्षित योजना

LED बल्ब कसा तयार केला जातो यासाठी सरकारकडून मान्यताप्राप्त अनेक संस्था ट्रेनिंग देतात. एलईडी बल्ब बनवणाऱ्या कंपन्याही ट्रेनिंग देतात. या ट्रेनिंगमध्ये प्रॅक्टिकल आणि थेअरी दोन्हीची माहिती दिली जाते. एलईडी बल्बची मागणी शहर आणि गावातही वाढते आहे. याचा प्रकाश चांगला असतो आणि विजेचीही बचत केली जाते. प्लॅस्टिकपासून तयार होत असल्याने हा बल्ब काचेच्या बल्बच्या तुलनेत टिकाऊदेखील असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या