नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : फेसबुकची मूळ कंपनी मेटाने बुधवारी सांगितले की, ती कर्मचाऱ्यांना किमान चार महिन्यांचा पगार देणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की, कंपनीने 13 टक्के किंवा सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे. घटती कमाई आणि तंत्रज्ञान उद्योगात सुरू असलेल्या संकटामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे झुकेरबर्गने बुधवारी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले. कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी स्वत: कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली. महसुलात झालेली घट, हे त्यामागचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. किती वेतन मिळणार - झुकेरबर्गने बुधवारी कर्मचाऱ्यांना सांगितले की, त्यांना एक ई मेल पाठवून त्यांचे नाव कर्मचारी कपातीमध्ये आहे की नाही, हे सांगितले जाईल. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात येईल त्यांना 16 आठवड्यांचा मूळ वेतन, तसेच कंपनीसोबत घालवलेल्या प्रत्येक वर्षासाठी दोन अतिरिक्त आठवड्यांचा पगार दिला जाईल, असे ते म्हणाले. या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्य विमा सहा महिन्यांसाठी सुरू राहणार आहे. हेही वाचा - Money Mantra - ज्याची प्रतीक्षा करत होता तो क्षण आलाच; ‘ही’ रास असेल तर प्रमोशन नक्की समजा झुकेरबर्ग स्वत:ला मानले दोषी - कर्मचारी कपातीबाबत झुकेरबर्गने एका निवेदनात म्हटले आहे की, “दुर्दैवाने, माझ्या अपेक्षेप्रमाणे ते झाले नाही.” “ऑनलाईन कॉमर्समधील पूर्वीचे ट्रेंड परत आले आहेत, परंतु त्याच वेळी, आमचा महसूल माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाला आहे कारण व्यापक आर्थिक मंदी, वाढलेली स्पर्धा आणि कमी जाहिरातींची चिन्हे आहेत,” ते म्हणाले, मी याला चुकीच्या पद्धतीने समजले त्यामुळे गैरसमज झाला आणि मी त्याची जबाबदारी घेतो." ऑनलाइन जाहिरातींचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि मेटाच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत असलेल्या आर्थिक मंदीमुळे कंपनीसाठी संकट वाढले. या उन्हाळ्यात मेटाने इतिहासात प्रथमच तिमाही कमाईत घट अनुभवली. “मेटाव्हर्स” मध्ये मेटा मेटा आणि त्याच्या जाहिरातदारांना संभाव्य मंदीचा सामना करावा लागत आहे.