JOIN US
मराठी बातम्या / मनी / गेल्या आठवड्यात शेअर बाजार 2 टक्के वधारला, पुढच्या आठवड्यात कशी असेल बाजाराची चाल?

गेल्या आठवड्यात शेअर बाजार 2 टक्के वधारला, पुढच्या आठवड्यात कशी असेल बाजाराची चाल?

गेल्या आठवड्यात, सेन्सेक्स 1,478.38 अंकांनी (2.47 टक्के) वाढून 61,223.03 वर बंद झाला, तर निफ्टी 443.1 अंकांनी (2.48 टक्के) वाढून 18,255.8 वर बंद झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जानेवारी : 14 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात पॉवर, रिअॅल्टी सेक्टर आणि मिड-स्मॉलकॅप शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गेल्या आठवड्यात, सेन्सेक्स 1,478.38 अंकांनी (2.47 टक्के) वाढून 61,223.03 वर बंद झाला, तर निफ्टी 443.1 अंकांनी (2.48 टक्के) वाढून 18,255.8 वर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल बोलायचे झाल्यास, बीएसई पॉवर निर्देशांक 7.4 टक्के, कॅपिटल गुड्स निर्देशांक 6 टक्के, रियल्टी निर्देशांक सुमारे 5 टक्के आणि माहिती तंत्रज्ञान निर्देशांक 3 टक्क्यांनी वधारला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये 2-3 टक्क्यांनी वाढ झाल्याने ब्रॉडर निर्देशांकांनी प्रमुख निर्देशांकांना मागे टाकले. गेल्या आठवड्यात 100 हून अधिक स्मॉलकॅप शेअर 10 ते 47 टक्क्यांनी वधारले. यामध्ये प्रामुख्याने Gujarat Mineral Development Corporation, Ajmera Realty, Greaves Cotton, Deepak Fertilizers, BCL Industries, Kellton Tech Solutions, Urja Global, Vikas Lifecare, Dollar Industries आणि India Nippon Electricals इत्यादींचा समावेश आहे. दुसरीकडे, GNA Axles, BGR Energy Systems, Shriram EPC, Hikal, Mahanagar Telephone Nigam, Kilpest India आणि Vishwaraj Sugar Industries शेअर 8 ते 25 टक्क्यांनी घसरले. Multibagger Stock : आठवडाभरात बंपर कमाई; ‘या’ शेअर्समुळे गुंतवणूकदारांना 90 ते 50 टक्के रिटर्न्स कोटक सिक्युरिटीजच्या अमोल आठवले यांचं पुढील आठवड्याबाबत मत अमोल आठवले म्हणाले की, बाजाराचा टेक्चर बुलिश आहे, परंतु जास्त तेजीमुळे बाजार 18,050 ते 18,375 दरम्यान कन्सोलिडेट होऊ शकतो. बुल्ससाठी 18,375-18,400 वर इन्स्टंट रेजिस्टन्स असेल आणि जर त्यापेक्षा जास्त ब्रेकआउट असेल तर ते 18,500 च्या पातळीवर जाऊ शकते. दुसरीकडे, 18,150 वर मजबूत सपोर्ट दिसत आहे, जर निर्देशांक त्याच्या खाली बंद झाला, तर निफ्टी पुन्हा 18,050-18,000 च्या पातळीला स्पर्श करू शकतो. बँक निफ्टीने करेक्शनचा एक टप्पा पूर्ण केला आहे आणि सध्या 9-day SMA वर सपोर्ट घेत आहे. त्याच्या स्ट्रक्चरनुसार, ते 38,000 आणि 37,500 मजबूत सपोर्ट झोनमध्ये व्यापार करेल. जर ते त्याच्या वर गेले तर ते 39,000-39,300 च्या दिशेने रॅली चालू ठेवू शकते. Share Market Tips: Budget 2022 पूर्वी Zerodha च्या निखिल कामत यांचा सल्ला वाचाच, फायद्याची होईल गुंतवणूक Bonanza Portfolio चे विशाल वाघ यांचा पुढील आठवड्यासाठी मार्केट आउटलुक विशाल वाघ म्हणाले की, निफ्टीला आगामी ट्रेडिंग सत्रांसाठी 18,000-18,080 स्तरांवर चांगला शॉर्ट टर्म सपोर्ट दिसेल आणि वरच्या बाजूने त्याला 18,340 स्तरांवर रजिस्टन्स दिसेल. ट्रेडर्स आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी उत्सुक असतील कारण ते कोणत्याही मोठ्या कार्यक्रमापूर्वी अस्थिरतेसाठी आणि नफा बुक करण्यासाठी स्वतःला तयार करतात. मात्र निर्देशांकाची विस्तृत रचना अजूनही बुल्सच्या बाजूने आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या