JOIN US
मराठी बातम्या / मनी / लोनही असतात गुड आणि बॅड! पण ते कसं ओळखायचं? ही आहे ट्रिक

लोनही असतात गुड आणि बॅड! पण ते कसं ओळखायचं? ही आहे ट्रिक

कोणतंही लोन घेण्यापूर्वी तुम्हाला त्या कर्जाची किती गरज आहे हे पाहावं. तुम्ही नेहमी बॅड लोन कॅटेगरीत येणारे कर्ज घेणे टाळावे. जाणून घेऊया ते कसं ओळखायचं.

जाहिरात

गुड लोन आणि बॅड लोन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 मे : आजकाल, बहुतेक लोक पैशाची गरज असताना घाईघाईने कर्ज घेतात. सध्या असे अनेक अँड्रॉइड अॅप्सही उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही लगेच कर्ज घेऊ शकता. पण तुम्हाला माहित आहे का की कर्जाची देखील गुड आणि बॅड 2 कॅटेगिरीमध्ये विभाजित केले जाते. कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी झाल्यामुळे, लोक त्याच्या नुकसानीकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि बॅड लोनच्या जाळ्यात अडकत राहतात.

जे कर्ज तुमची नेटवर्थ वाढवते त्याला गुड लोन म्हणतात आणि ज्या कर्जामध्ये तुम्हाला कर्जाची रक्कम त्यावरील व्याजासह भरावी लागते त्याला बॅड लोन म्हणतात. जर तुम्ही आधीच कर्ज घेतले असेल किंवा तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगल्या आणि वाईट कर्जाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

‘पीपीएफ’मध्ये गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

गुड लोन म्हणजे काय?

गुड लोन ते आहे जे तुमची नेट वर्थ वाढवते. हे तुम्हाला वेळेबरोबर अधिक मालमत्ता जेनेरेट करण्यास मदत करते ज्यामुळे करिअर, संपत्ती इत्यादींमध्ये पॉझिटिव्ह ग्रोथ होते. तसेच, ज्या लोनमध्ये रिटर्नचा दर त्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असेल, त्याला गुड लोन म्हणतात. या कॅटेगिरीत तुम्ही एज्युकेशन लोन, बिझनेस लोन, होम लोन इत्यादी ठेवू शकता.

बॅड लोन म्हणजे काय?

बॅड लोन असे आहे ज्यामध्ये तुम्हाला कर्जाची रक्कम त्यावरील व्याजासह भरावी लागते. या प्रकारात कर्ज देणारा आणि घेणारा दोघांनाही तोटा सहन करावा लागतो. ही कर्जे वेळेवर न भरल्यास पुढील कर्ज मिळणे कठीण होते. त्याचबरोबर बॅड लोनचे व्याजदरही खूप जास्त आहेत. या कॅटेगिरीमध्ये तुम्ही ऑटो कर्ज, पर्सनल लोन, क्रेडिट कार्डवरील लोन, कन्ज्यूमेबल लोन इत्यादी ठेवू शकता.

सोशल मीडियावर जाहिरात पाहून प्रोडक्ट्स मागवताय? होऊ शकते फसवणूक, असा करा बचाव

संबंधित बातम्या

बॅड लोनपासून असा करा बचाव

तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करता तेव्हा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जसे की तुमच्यासाठी कर्ज घेणे किती महत्त्वाचे आहे आणि त्याशिवाय तुमच्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का हे देखील पाहा. तुम्ही लोन घेऊन पैसे खर्च करु शकता. परंतु तुम्हाला हे कर्ज एक दिवस फेडावेच लागेल. त्यामुळे आधी बचत करा आणि मग खरेदी करा. यासोबतच, कर्ज घेताना तुम्ही डेट टू इन्कम रेश्योकडे लक्ष ठेवा आणि ते 40 टक्क्यांपेक्षा जास्त वर जाऊ देऊ नका. हे 30 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर चांगलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या