जळगावात 15 दिवसांत ९ हजाराने वाढली चांदी
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी, जळगाव : सोन्याचे दर आता उतरले आहेत, 61 हजारांवर पोहोचलेलं सोनं आता 59 वर आलं आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर मात्र चढेच आहेत. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात पंधरवड्यात चांदीला झळाळी मिळाली आहे. सोने-चांदी या मौल्यवान धातूच्या दरात सातत्याने अनेक कारणांनी चढ-उतार होत असतात. प्रामुख्याने सोन्याच्या दरात अधिक प्रमाणात चढ-उतार होते. पंधरवड्यात सोन्यापेक्षा चांदीचे दर अधिक वधारले. सोने दरात 800 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 1300 रुपयांची वाढ झाली आहे. 2 हजारांच्या नोटा खपवण्यासाठी असाही ‘गोल्डन चान्स’, सराफ बाजारात गर्दी 1 जून रोजी सोन्याचे प्रति तोळ्याचे दर 60,600 रुपये होते. 5 आणि 12 जून रोजी ते 60 हजारांवर पोहोचले. त्यानंतर घसरण होऊन 59350 पर्यंत (दि. १५) खाली गेले. सरलेल्या आठवड्यातील शनिवारी 59,800 रुपये झाले. म्हणजेच 800 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली.
चांदी 1 जून रोजी 72,200 रुपये किलो होती. त्यात वाढ होऊन ती 10 जूनला सर्वाधिक 74,500 रुपयांवर पोहोचले. त्यानंतर पुन्हा घसरण होऊन रविवारी दर 73,500 रुपयांवर पोहोचले. म्हणजे चांदीच्या दरात या काळात 1300 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. आता विकता येणार नाहीत जुने दागिने! हॉलमार्किंगचं नियोजन बिघडलं, नवा नियम काय? सोने मागणीत आंतरराष्ट्रीय पातळीवर घट झाल्याने दर घसरले आहेत. आगामी काळात येणाऱ्या अधिक मासात जावयाला दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंत चांदीच्या वस्तूंचा समावेश असल्याने चांदीच्या मागणीत प्रामुख्याने वाढ होते.