मुंबई, 14 जून : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला कौन बनेगा करोडपतीचा नवा सीझन सुरू होणार आहे. याच्या नवीन प्रोमोने देशात 2000 रुपयांची नोट पुन्हा एकदा चर्चेत आणली आहे. पण, चलनातील नोटेत नॅनो जीपीएस (Nano GPS) तंत्रज्ञान आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. भारतात जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा नवीन चलनात आलेल्या 500 आणि 2 हजारच्या नोटांमध्ये नॅनो चीप असल्याचा बातम्यांना ऊत आला होता. नंतर या सर्व बातम्या अफवा असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, अशा नोटा विकसित केल्या जाऊ शकतात का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला आहे. भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर या चर्चा कशा सुरू झाल्या हाही मोठा प्रश्न आहे. पण, जगात अशी कोणतीही नोट करण्याचा विचार केला आहे का? ज्यामध्ये नॅनो जीपीएस तंत्रज्ञान लागू असेल. यासोबतच ही जीपीएस यंत्रणा काय आहे आणि कुठे वापरली जाते, असाही प्रश्न आहे. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीची घोषणा केली तेव्हा त्यांनी आम्ही नव्या नोटा आणू असे सांगितले होते. काही काळानंतर 2000 रुपयांची नवी नोट अधिकृतपणे आणण्याची बाब समोर आली. या नोटेचे छायाचित्र प्रथमच प्रसिद्ध होताच, त्यानंतर सोशल मीडियापासून ते टीव्हीच्या बातम्यांपर्यंत 2000 ची नवीन नोट नॅनो जीपीएस तंत्रज्ञानाने युक्त असल्याची चर्चा जोर धरू लागली. या तंत्रज्ञानामुळे या नोटा कोणीही मोठ्या प्रमाणावर लपवून ठेवू शकणार नाही, असे सांगण्यात आले. यातील जीपीएस सिस्टिममुळे ते मोठ्या प्रमाणावर कोणी लपवले आहे की नाही हे लगेच कळेल. मात्र, नंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. 2000 रुपयांच्या नोटेमध्ये असे कोणतेही तंत्रज्ञान वापरले जाणार नाही, असे रिझर्व्ह बँकेपासून सरकारला सांगावे लागले. तज्ञ काय म्हणतात? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, असा कोणताही नॅनो जीपीएस आतापर्यंत शोधला गेला नाही, जो कागदी नोटांमध्ये निश्चित करता येईल. याचा मोठ्या प्रमाणात वापर इतका सोपा नाही. प्राण्यांपासून प्रत्येक गोष्टीचा मागोवा घेण्यासाठी जीपीएस चिपचा वापर अनेक देशांत केला जात असला, तरी कागदी नोटांमध्ये त्याच्या वापराचा विचार करता येत नाही. देशातील महागाई आता वाढणार नाही, SBI च्या रिपोर्टमध्ये दावा नॅनो GPS चा वापर चलनात झाला आहे का? नाही. आतापर्यंत अजिबात नाही. जगातल्या कागदी चलनाच्या 350 वर्षांहून अधिक वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत त्याचा विचारही झाला नाही. जगातील पहिली कागदी नोट चीनमध्ये सातव्या शतकात टेंग आणि सॉन्ग राजवंशाच्या काळात सुरू झाली. मात्र, बँकनोट युरोपमध्ये 1661 मध्ये सुरू झाली. जगातील कोणताही देश कोणत्याही प्रकारे अशा तंत्रज्ञानावर काम करत नाही. कारण असे मानले जाते की कागदी चलन हळूहळू संपेल, डिजिटल चलन त्याची जागा घेईल. अनेक देशांनी चलनी नोटांचे उत्पादन बंद केले आहे.
जीपीएस तंत्रज्ञान काय आहे आणि ते कशासाठी वापरले जाते? जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, मुळात ती आकाशात फिरणाऱ्या उपग्रहांद्वारे काम करते. मात्र, त्यासाठी एक-दोन नव्हे, तर 24 उपग्रहांच्या गटाची मदत घेतली जाते. आजच्या युगात, ते लोकेशन नेव्हिगेशन, पोझिशनिंग, लोकेशन सर्च इत्यादीसाठी वापरले जाते. GPS पहिल्यांदा कधी वापरला गेला? प्रहिल्यांदा 1960 च्या दशकात यूएस सैन्याने जीपीएसचा वापर त्यांच्या कामासाठी केला होता. मात्र, 80 च्या दशकात तो व्यावसायिक आणि नागरी क्षेत्रात वापरला गेला. आता हे विमान, रडार, मोबाईल, ऑटोमोबाईल, घड्याळे, जीआयएस उपकरणे इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. आता ई-वॉलेटच्या मदतीने ATM मधून काढा पैसे हे कसं काम करतं? यामध्ये पृथ्वीच्या वर फिरणारे उपग्रह सिग्नल पाठवतात आणि पृथ्वीवरील रिसीव्हर्स त्यांना प्राप्त करतात, ज्याद्वारे त्यांचे स्थान, वेग किंवा हालचाल ओळखली जाते. पण हे सिग्नल अनेक उपग्रहांद्वारे पाठवले जातात. मग रिसीव्हर ते सिग्नल्स रिसिव्ह करून वाचतो आणि जेव्हा हे घडते तेव्हा संबंधित उपकरणे नेव्हिगेशन, पोझिशन, स्पीड, लोकेशन इत्यादी सर्व काही सांगू लागतात. या प्रणालीच्या चांगल्या गणनासाठी किमान चार उपग्रह वापरले जातात. यावरून ही वस्तू कुठे आहे, तिचे अंतर किती आहे, तिचा वेग किती आहे आणि निश्चित स्थळी किती वेळ पोहोचू शकेल हेही कळते.
आता कोणत्या गोष्टी जास्त वापरल्या जातात? - लोकेशन गॅजेट - नकाशा तयार करणे - ऑब्जेक्ट मॉनिटरिंग मध्ये - गेमिंग आणि पोझिशनिंग मध्ये - प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे - हवाई वाहतूक - फिटनेसच्या गणने