मुंबई, 21 फेब्रुवारी : गुंतवणुकीत सुरक्षितता, चांगला परतावा आणि लवचिकता असेल तर ती प्रत्येकासाठी सोपी बनते. आज बाजारात असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय (Investment Options) उपलब्ध आहेत जे तुमच्या प्रत्येक गरजेनुसार आहेत. असा एक पर्याय म्हणजे मल्टी ऑप्शन डिपॉझिट (Multi Option Deposite- MOD). स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मल्टी ऑप्शन डिपॉझिटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा पैसे काढता येतात. या गुंतवणुकीत तुम्ही एटीएमच्या मदतीनेही पैसे काढू शकता. MOD तुमच्या बचत खात्याशी जोडलेले आहे. मल्टी ऑप्शन डिपॉझिट खात्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला पैशांची गरज आहे आणि तुमच्या बचत खात्यात पैसे कमी असतील तर तुम्ही MOD खात्यातून तुमच्या बचत खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता आणि ATM च्या मदतीने पैसे काढू शकता. हे खाते FD सारखे एसबीआयचे म्हणणे आहे की ज्या प्रकारे बँकेत मुदत ठेव (Fixed Deposite) खाते उघडले जाते, त्याच प्रकारे मल्टी ऑप्शन डिपॉझिट खाते उघडले जाऊ शकते. एसबीआय मल्टी ऑप्शन डिपॉझिट खात्यात 10,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. त्यापेक्षा जास्त रक्कम 1000 च्या पटीत जमा करता येते. कोणतीही कमाल ठेव मर्यादा नाही. येथे तुम्ही एक वर्षापासून ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. EPS पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता कधीही जमा करता येणार Life Certificate व्याजावर टीडीएस कापला जातो तुमच्या मल्टी ऑप्शन डिपॉझिट खात्यावर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम 10,000 पेक्षा जास्त असल्यास त्यावर TDS कापला जातो. पॅनकार्डचे तपशील सादर केल्यास ते 10 टक्के असेल आणि जमा न केल्यास 20 टक्के TDS असेल. MOD खात्यावर देखील कर्ज घेतले जाऊ शकते. त्यात नॉमिनेशनचीही सोय आहे. ऑटो रिन्यूएबल सुविधा उपलब्ध नाही. हे खाते एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरित केले जाऊ शकते. SBI च्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) वर MODS वर समान व्याज उपलब्ध आहे. Online PF Transfer साठी आहे सोपी प्रोसेस, पाहा कसं कराल अप्लाय SBI MOD खाते SBI MOD खाते 1 ते 5 वर्षांसाठी उघडता येते. यामध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा आहे. या गुंतवणुकीवर कर्ज आणि नॉमिनेशन घेण्याची सुविधाही आहे. ते बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर केले जाऊ शकते. तुमच्यासाठी मल्टी ऑप्शन डिपॉझिटशी जोडलेल्या बचत खात्यामध्ये किमान शिल्लक राखणे अनिवार्य आहे.