JOIN US
मराठी बातम्या / मनी / दरमहा या योजनेत करा 1000 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 12 लाख; वाचा काय आहे स्कीम

दरमहा या योजनेत करा 1000 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 12 लाख; वाचा काय आहे स्कीम

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक अत्यंत उत्तम पर्याय आहे. पूर्वीपासूनच सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांमधील प्राधान्याचा पर्याय म्हणून ही योजना लोकप्रिय आहे. करबचतीसाठीही याचा फायदा होत असल्यानं नोकरदार लोक यात आवर्जून गुंतवणूक करतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 डिसेंबर: कोरोनाच्या संकटामुळे (Coronavirus Pandemic) बचतीचे (Savings) महत्त्व सर्वांनाच अधिक ठळकपणे समजले आहे. त्यामुळे अनेक लोक आता अधिक सजगपणे बचत करण्याकडे लक्ष देऊ लागले आहेत. चांगला परतावा देणारे आणि सुरक्षित गुंतवणूक (Investment options) पर्याय निवडण्यावर भर दिला जात आहे. अशा लोकांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक अत्यंत उत्तम पर्याय आहे. पूर्वीपासूनच सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांमधील प्राधान्याचा पर्याय म्हणून ही योजना लोकप्रिय आहे. करबचतीसाठीही याचा फायदा होत असल्यानं नोकरदार लोक यात आवर्जून गुंतवणूक करतात. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफमधील गुंतवणूक सरकारकडून पूर्णपणे संरक्षित आहे. दीर्घ कालावधीसाठी यात गुंतवणूक केल्यास मोठा निधी याद्वारे निर्माण करता येतो. सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी तसंच मोठ्या खर्चांच्या तरतुदीसाठी पीपीएफमधील गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची ठरते. याचा व्याजदरही (Interest Rate ) बँकांच्या मुदत ठेवीपेक्षा (Bank FD) अधिक असतो, तसंच चक्रवाढ पद्धतीनं (Compound Interest Rate) व्याज मिळत असल्यानं याचा परतावा अधिक असतो. या योजनेत नियोजनपूर्वक गुंतवणूक केल्यास कमी गुंतवणूकीत मोठा फायदा होऊ शकतो. पीपीएफमध्ये दर महिन्याला फक्त 1000 रुपये जमा करून तुम्ही 12 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळवू शकता. हे वाचा- शेअर बाजार तेजीत; अवघ्या 15 मिनिटात गुंतवणूकदारांनी कमावले 2.75 लाख कोटी! पीपीएफ खात्यात दरवर्षी किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेची मुदत 15 वर्षे असते. यानंतर, तुम्ही हे पैसे काढू शकता किंवा तुम्ही आणखी 5 वर्षांसाठी तीन वेळा मुदत वाढवू शकता. या योजनेसाठी सामान्यतः 7 ते 8 टक्के व्याजदर असतो, आर्थिक परिस्थितीनुसार त्यात वाढ किंवा घट होऊ शकते. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत पीपीएफच्या व्याजदरात बदल करते. सध्या याचा व्याज दर 7.1 टक्के आहे. बँकांच्या मुदत ठेवीच्या व्याज दरापेक्षा हा व्याजदर जास्त आहे. चक्रवाढ पद्धतीने म्हणजे व्याजावर व्याज या पद्धतीने व्याज दिले जाते. त्यामुळे यात मिळणारे व्याजही अधिक असते. दरमहा 1000 रुपये भरल्यास.. पीपीएफ खात्यात तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये जमा केले तर 15 वर्षांत तुम्ही दरवर्षी 12 हजार या प्रमाणे 1.80 लाख रुपये इतकी रक्कम गुंतवाल. त्यावर तुम्हाला 1.45 लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजेच मुदतीनंतर तुम्हाला एकूण 3.25 लाख रुपये मिळतील. आता याची मुदत 5 वर्षे वाढवली आणि दरमहा 1000 ची गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 2.40 लाख रुपये होईल. या रकमेवर 2.92 लाख रुपये व्याज मिळेल. या मुदतीनंतर तुम्हाला 5.32 लाख रुपये मिळतील. तुम्ही 15 वर्षांच्या मुदतीनंतर तीनवेळा 5 वर्षांसाठी मुदत वाढवली म्हणजेच एकूण तीस वर्षे यात दरमहा 1000 रुपये याप्रमाणे गुंतवणूक केली तर मुदतीअंती तुम्ही 3.60 लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असेल आणि त्यावर 8.76 लाख रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे एकूण 30 वर्षांच्या मुदतीनंतर तुमच्याकडे 12.36 लाख रुपयांचा निधी जमा झालेला असेल. हे वाचा- LIC पॉलिसीवरही घेऊ शकता पर्सनल लोन, व्याज किती? अर्ज कसा करायचा? कर्ज सुविधा पीपीएफ खात्यावर कर्ज (Loan) घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे; पण याचा फायदा खाते उघडण्याच्या तिसऱ्या किंवा सहाव्या वर्षापासून घेता येतो. या योजनेतील तुमच्या गुंतवणूकीला 6 वर्षे पूर्ण झाल्यावर, तुम्ही त्यातून काही रक्कम काढूही शकता. यातील व्याज उत्पन्न करमुक्त असते. त्यामुळे कर बचतीसाठी (Tax Benifit) ही गुंतवणूक दाखवता येते. अशाप्रकारे दुहेरी लाभ देणारी ही योजना गुंतवणूकीचा अत्यंत उत्तम पर्याय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या