JOIN US
मराठी बातम्या / मनी / International Yoga Day : 'असा' करा योगाचा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये

International Yoga Day : 'असा' करा योगाचा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये

International Yoga Day - योग शिकण्याकडे सगळ्यांचा कल वाढलाय. त्यामुळे योग शिकवणं हाही व्यवसाय सध्या वाढतोय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : योग हा आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. प्रत्येक जण योग करत असतो. योग शिकण्याकडे सगळ्यांचा कल वाढलाय. त्यामुळे योग शिकवणं हाही व्यवसाय सध्या वाढतोय. योग शिक्षक होण्यासाठी कठीण प्रशिक्षण करावं लागतं. सर्टिफिकेटही मिळतं. व्यवसाय सुरू करायला हे ट्रेनिंग आणि सर्टिफिकेट गरजेचं आहे. तुम्हीही योग शिक्षक होऊ शकता. या व्यवसायात चांगली कमाई होते. अगोदर ट्रेनिंग आणि सर्टिफिकेट योगाद्वारे तुम्हाला कमाई करायची असेल तर दीड वर्ष तुम्हाला कठीण ट्रेनिंग आणि सर्टिफिकेटची गरज आहे. देशात अशा काही संस्था आहेत त्या योग शिकवण्याचं प्रशिक्षण आणि सर्टिफिकेट देतात. त्यातून तुम्ही तुमचं करियर घडवू शकता. International Day of Yoga: रांचीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली योगसाधना योग शिक्षक बना योगापासून कमाई करायची असेल तर तुम्हाला लोकप्रिय योग शिक्षक व्हावं लागेल. तुमचं ट्रेनिंग जितकं चांगलं तितके तुम्ही चांगले योग शिक्षक होऊ शकता. सुरुवातीला जास्त कमाई होणार नाही. पण एकदा का जम बसला की कमाई वाढू शकते. बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांची योगसाधना ट्रेनिंग सेंटर सुरू करा तुम्ही योगाचं ट्रेनिंग सेंटर सुरू करू शकता. योग आणि फिटनेस सेंटर आधुनिक योगाचा भाग आहे. हल्ली पाॅवर योग हाही प्रकार शिकवला जातो. त्यालाही मागणी आहे. तुम्ही तुमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आधुनिक आणि पारंपरिक योग यांची उत्तम सांगड घालू शकता. International Yoga Day: खुर्चीवर बसूनच करू शकता ही योगासनं, हवी फक्त 5 मिनिटं किती होईल कमाई? तुम्ही योग शिक्षक होऊन सुरुवातीला 20 ते 30 हजार दर महिना कमावू शकता. ट्रेनर कोणाच्या घरी जाऊन शिकवत असेल तर जास्त पैसे मिळतात. एखाद्या आजारी व्यक्तीला उपचार म्हणून योग शिकवायचा असेल तर 50 ते 60 हजार रुपये कमाई होऊ शकते. जुने योग प्रशिक्षक तर महिना लाखानं कमाई करतात. VIDEO: योग फिव्हर! डॉग स्क्वॉडने केलेल्या ह्या कवायती तुम्ही पाहिल्या का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या